maharashtrachi hasyajatra fame actor prithvik pratap new marathi movie delivery boy SAKAL
मनोरंजन

Prithvik Pratap: 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापचा नवीन सिनेमा, प्रथमेश परबसोबत होणार 'डिलीव्हरी बॉय'

पृथ्वीक प्रतापच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Prithvik Pratap Movie News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सर्वांचा आवडीचा शो. या शोमध्ये विविध कलाकार त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. हास्यजत्रामधला असाच एक कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप.

पृथ्वीकने आजवर हास्यजत्रेत नवनवीन व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. अशातच पृथ्वीक आता रुपेरी पडद्यावर आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव डिलीव्हरी बॉय. जाणून घ्या या सिनेमाबद्दल.

'डिलिव्हरी बॉय'ची घोषणा

'डिलिव्हरी बॉय' हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या दिवशी भेटीला येणार डिलीव्हरी बॉय

यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे दीपा नायक प्रस्तुतकर्ता आहेत तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. हसत हसत सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिलिव्हरी बॅाय’ का आहे, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.’’

दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT