Maharashtrachi Hasyajatra fame actress Vanita Kharat Pre Wedding photos viral sakal
मनोरंजन

Vanita Kharat: वनिता खरात भलतीच जोरात! ओठांचं चुंबन घेत केलं फोटोशूट..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

नीलेश अडसूळ

Vanita Kharat Pre Wedding photoshoot: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं आहे. याच कार्यक्रमातील आपल्याला खळखळून हसवणारी एक इरसाल अभिनेत्री म्हणजे 'वनिता खरात'. आजवर आपल्या अभिनयाने आणि विनोदाने चर्चेत असलेली वनिता आज तिच्या फोटोंशूटमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती चक्क चुंबन घेताना दिसत आहे.

(Maharashtrachi Hasyajatra fame actress Vanita Kharat Pre Wedding photos viral)

वनिताने ज्याच्या सोबत चुंबन घेतानाचा फोटों शेयर केला आहे, तो दूसरा तिसरा कोणी नसून तिचा होणारा नवरा आहे. सुमित लोंढे असं त्याचं नाव असून वनिता गेले काही दिवस सातत्याने त्याच्याविषयी पोस्ट करत आहे. कारण, लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. या निमित्ताने नुकतेच त्यांनी एक प्री वेडिंग फोटोशूट केले, जे सध्या बरेच चर्चेत आले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सुमित आणि वनिता केली अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांच्या नात्याला खऱ्या अर्थाने संमती मिळाली असून दोघेही लग्न करणार आहेत.

सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमीतने या आधी बऱ्याचदा दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. पण वनिता मात्र हल्लीच त्यांच्या नात्याबाबत जाहीरपणे बोलू लागली. आता तर ही फोटो समोर आल्याने चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT