Maharashtrachi Hasyajatra fame namrata sambherao shared an emotional post for husband yogesh sambherao on 10th wedding anniversary sakal
मनोरंजन

Namrata Sambherao: हे असंच टिकवून ठेवूया.. लग्नाच्या वाढदिवशी नम्रताची नवऱ्यासाठी भावूक पोस्ट..

नम्रता संभेरावची पती योगेशसाठी खास पोस्ट..

नीलेश अडसूळ

Namrata Sambherao shared post for husband on anniversary : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'.

तिनं साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

विशेष म्हणजे, ती बऱ्याचदा आपल्या नवऱ्याविषयी म्हणजे योगेश संभेराव विषयी बोलत असते. त्यांचा प्रेमविवाह आहे. दोघांनीही आयुष्यात एकमेकांना खूप साथ दिली आहे. आज त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली. त्यानिमित्ताने नम्रताने आज एक खास भावनिक पोस्ट लिहिली आहे.

(Maharashtrachi Hasyajatra fame namrata sambherao shared an emotional post for husband yogesh sambherao on 10th wedding anniversary)

नम्रताने लिहिले आहे की, ''जुळले रे नाते अतूट झाली जन्मजन्मांची भेट.. घेऊनिया प्रीतीची आण एकरूप होतील प्राण.. आज आमच्या लग्नाला आणि सहवासाला 10वर्ष झाली पूर्ण झाली तुझी सोबत अशीच आयुष्यभर राहू दे हीच देवाकडे प्रार्थना..''

''माझ्या सुखात तू तुझं सुख मानतोस.. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं कि तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतात हे खूप अनमोल आहे हे असंच टिकवून ठेवूया.. माझ्या कामाबद्दल तुला वाटणारा आदर हा मला खूप ताकद देतो बळ देतो'' अशा शब्दात नम्रताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नम्रता आणि योगेश 2013 मध्ये विवाह बंधनात अडकले. ते एकमेकांना कॉलेज मध्ये असल्यापासून ओळखत होते. आधी मैत्री आणि मग प्रेम असा त्यांचा प्रवास आहे. नम्रताने वारंवार योगेश विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो प्रचंड सपोर्टीव्ह आहे. तिच्या पाठिंब्यामुळेच आज नम्रता ही सगळं करू शकली, असं ती मानते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT