maharashtrachi hasyajatra fame shivali parab parents proud moment receiving award behalf of her  SAKAL
मनोरंजन

Shivali Parab: ती स्टेजवर जाऊन घाबरली... शिवाली परबच्या गैरहजेरीत पुरस्कार स्वीकारताना आईची अशी अवस्था

सध्या अमेरिकेत असल्याने शिवाली हा आनंद साजरा करायला भारतात उपस्थित नव्हती

Devendra Jadhav

Shivali Parab News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सोशल मिडीयावर कायम चर्चेत असते. शिवाली परबने महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या मनामनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. शिवाली परब सध्या हास्यजत्रा टीमसोबत अमेरिका टूरवर गेली आहे.

शिवालीच्या आयुष्यात नुकताच एक छान प्रसंग घडला. ज्यामुळे शिवालीला आनंद साजला. पण सध्या अमेरिकेत असल्याने शिवाली हा आनंद साजरा करायला भारतात उपस्थित नव्हती.

अशावेळी शिवालीच्या आईची नेमकी काय अवस्था झाली होती याचं खास वर्णन शिवालीने केलंय. बघुया काय झालंय...

(shivali parab from maharashtrachi hasyajatra mother proud moment)

शिवालीची आई पुरस्कार स्वीकारताना घाबरली

शिवालीचा यंदाचा GOLDEN WOMAN ICON AWARDS 2023 पुरस्कार मिळाला. पण सध्या अमेरिकेत असल्याने शिवाली हा पुरस्कार स्वीकारताना गैरहजर होती. तेव्हा शिवालीच्या वतीने तिच्या आईने हा पुरस्कार स्वीकारला. फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन शिवाली लिहीते..

"19 July 2023 . GOLDEN WOMAN ICON AWARDS 2023.. तर ह्या वर्षाचं बेस्ट पॉप्युलर एंटरटेनर.. ऑफ द ईयर हे अवॉर्ड मला मिळालं , मला माझ्या कामामुळे जाता आलं नाही म्हणून माझे मम्मी आणि पप्पा गेलेले , मम्मी पहिल्यांदा स्टेज वर गेल्यामुळे जरा घाबरलेली आणि जास्त खूश होती

मम्मी स्टेज वर गेली तरी, पप्पांची हिंमतच नाही झाली , पण आनंद हा आहे की ते दोघे ही खूप खूप खुश आहेत … thankyou everyone असंच माझ्या कामावर प्रेम करत रहा आणि मला सपोर्ट करत रहा." अशी पोस्ट शिवालीने लिहीलीय

शिवाली परबचं यशस्वी करीयर

शिवाली अत्यंत मेहनतीने इथवर पोहोचली आहे. एकेकाळी टीव्हीवर हास्यजत्रा पाहणारी शिवाली आज स्वतः टीव्हीवर हास्यजत्रा गाजवते आहे.

शिवालीची हास्यजत्रेतील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकप्रिय आहे. शिवालीची सर्वात गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे शिवाली अवली कोहली.

शिवाली अवली कोहलीच्या माध्यमातुन वेगळाच आवाज काढुन शिवाली तिच्या फॅन्सना खळखळुन हसवते. लेकीचा पुरस्कार स्वीकारल्याने शिवालीच्या आईला नक्कीच तिचा अभिमान वाटत असेल, यात शंका नाही.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT