maharashtrachi hasyajatra fame vanita kharat celebrates her birthday in america SAKAL
मनोरंजन

Vanita Kharat: 'माझ्या आयुष्यात तर....', हास्यजत्रा फेम कोळीवाड्याची रेखा वनिताने अमेरिकेत कापला बर्थडे केक!

वनिताने आयुष्यात पहिल्यांदा तिचा वाढदिवस अमेरिकेत साजरा केलाय

Devendra Jadhav

Vanita Kharat News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सध्या चांगलाच गाजतोय. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो पुन्हा एकदा सोनी मराठीवर सुरु झालाय.

सहकुटुंब हसूया या टॅगलाईन खाली महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा सुरु झालाय. प्रेक्षकांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळुन हसवायला सज्ज आहेत. हास्यजत्रेतील कोळीवाड्याची रेखा म्हणुन ओळख असलेली वनिता खरात हिचा काहीच दिवसांपुर्वी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने वनिताने सोशल मिडीयावर पोस्ट केलीय.

(maharashtrachi hasyajatra fame vanita kharat celebrates her birthday in america)

काय आहे वनिताची पोस्ट?

वनिताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात वनिता खरातने नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केलीय.

वनिता लिहीते, "या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता,कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत... तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात ,

इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमित ने माझा हात धरला!"

केक कापताना आली नवऱ्याची आठवण

वनिता पुढे लिहीते.. "इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमित ची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमित ने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्या पर्यंत पोचावल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन.

जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. ता. क. - पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर I love you का ते तुम्हाला माहित आहे."

वनिता खरात वर्कफ्रंट

वनिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, वनिता पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये खळखळुन हसवताना दिसत आहे.

वनिताने काही महिन्यांपुर्वी सुमित लोंढे सोबत लग्न केलं. वनिता काहीच दिवसांपुर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमसोबत US TOUR ला जाऊन आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT