maharashtrachi hasyajatra fem priyadarshini indalkar talks about her struggle days and vanita kharat support sakal
मनोरंजन

Priyadarshini Indalkar: मुंबईत राहण्यासाठी जेव्हा घर नव्हतं तेव्हा वनिता खरातने.. प्रियदर्शिनीने सांगितली खास आठवण..

Phulrani: अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितले स्ट्रगलचे दिवस..

नीलेश अडसूळ

Priyadarshini Indalkar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकर आता 'फुलराणी' म्हणून आपल्या भेटीला आली आहे. सुबोध भावेच्या 'फुलराणी' चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत आहे. तिच्या या भूमिकेतील लुक सर्वांना भलताच आवडला असून सर्वत्र तिच्या लुकची चर्चा आहे.

प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. या कार्यक्रमातील तिच्या विनोदी कामाने सर्वांनाच हसवले. आता ती एका हटके भूमिकेतून आपल्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रिया सध्या सगळीकडे भेट डेट आहे. नुकतच एका मुलाखतीत तिने आपल्या स्ट्रगलच्या दिवसंविषयी सांगितले.

(maharashtrachi hasyajatra fem priyadarshini indalkar talks about her struggle days and vanita kharat support)

प्रियदर्शनी ही मुळची पुण्याची असून सध्या मुंबईमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये ती राहत आहे. पण सुरवातीला ते शक्य नव्हते, त्या विषयी प्रियदर्शनी म्हणाली, 'गेल्या दिड वर्षांपासून मी मुंबईमध्ये राहते.

मी आणि अभिनेत्री आरती मोरे एकत्र राहतो. आधी आम्ही दोघीही वेगळ्या घरात राहत होतो. पण ते घर आमच्या घरमालकांनी काही कारणास्तव विकलं. त्यानंतर आरती व मी एक दुसरं घर भाड्याने घेतलं आहे.

आरतीच्या रुपाने मला खूप चांगली जोडीदार मिळाली आहे. अजूनही आमच्यामध्ये कधीच भांडणं झाली नाहीत. आमचा अगदी सुखाचा संसार सुरु आहे,'असं प्रियदर्शिनी गंमतीने म्हणाली.

प्रियदर्शिनी पुढे म्हणाली, 'आमच्या हिचं प्रकरण... हे व्यावसायिक नाटक मी करत असताना मुंबईमध्ये येऊ लागले. या नाटकामध्ये भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर यांच्याही भूमिका होत्या. मी मुळची पुण्याची.

त्यामुळे सलग शनिवार, रविवार जेव्हा नाटकाचे प्रयोग असायचे तेव्हा मी नंदिता किंवा भार्गवी ताईकडे राहायचे. भार्गवी ताईकडेच मी खूप वेळा राहिली आहे. तेच माझं मुंबईतलं पहिलं घर होतं. नाटकात ती माझी आई होती. खऱ्या आयुष्यातही ती मला आईसारखीच वागणूक द्यायची.'


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामध्ये जेव्हा मी सहभाग घेतला तेव्हाही मी पुणे ते मुंबई प्रवास करायचे. तेव्हाही मुंबईमध्ये माझ्याकडे घर नव्हतं. जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची रिहर्सल असायची तेव्हा पहाटे मी पुण्यावरुन शिवनेरीने निघायचे.

दोन रात्र कुठेतरी राहायचं आणि तिसऱ्या दिवशी शूट करुन पुन्हा पुण्याला निघायचं. आठवड्यातून एकदा तरी असं व्हायचं. मग शिवालीही तेव्हा कल्याणला राहत होती. वनिता खरातचंही वरळीमध्ये घर होतं.

रिहर्सल उशीरापर्यंत असल्यामुळे प्रत्येकाला घरी पोहोचणं शक्य नव्हतं. मग आम्ही रात्री कोणाचं तरी घरी शोधायचो आणि तिथे राहायचो, असंही ती म्हणाली.


'लॉकडाऊननंतर वनिता कांदिवलीला राहायला आली होती. मग तेव्हा मी वनिताकडे राहायला लागले. त्यामुळे वनिता खरातचं घर हे माझं दुसरं घर होतं. शिवाली परब आणि मी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

पण त्यानंतर ‘असं माहेर नको गं बाई’ ही माझी मालिका सुरु झाली. या मालिकेचं चित्रीकरण ठाण्यात होतं. त्यामुळे आम्ही एकत्र राहिलो नाही. पण दोन महिने शिवाली आणि मी एकत्र राहिलो.' अशा स्ट्रगलच्या आठवणी प्रियदर्शिनीने सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT