Maharashtrachi Hasyajatra New Season Episode Starts date and time Know in details  SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra: तारीख ठरली, वेळही ठरली.. महाराष्ट्राची हास्यजत्रा परत सुरु होतंय! जाणुन घ्या सविस्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा एकदा त्याच दिमाखात सुरु आहे.

Devendra Jadhav

Maharashtrachi Hasyajatra News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा लाडका शो. बस, ट्रेन असो की चालु प्रवासात महाराष्ट्राची हास्यजत्रा शो प्रेक्षक आवर्जुन पाहतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो काही दिवसांपासुन ब्रेकवर होता.

पण महाराष्ट्राची हास्यजत्रा शो पाहण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा एकदा त्याच दिमाखात सुरु आहे.

(Maharashtrachi Hasyajatra New Season Episode Starts date and time Know in details)

कधी सुरु होणार हास्यजत्रा?

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या ब्लॅक अँड व्हाईट प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत.

पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत… पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलाय

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे

हास्यजत्रा टीम अमेरिका दौऱ्यावर

सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे कलाकार अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधील कलाकारांनी खळखळुन हसवलं. अमेरिकेत प्रियदर्शना गेली होती तेव्हा तिने पोस्ट शेअर केली होती.

प्रियदर्शनीने शेवटी लिहीलं.. त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास ९०० लोक, sold out show, २ तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं. खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते.

हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहुन आम्ही सगळे भारावुन गेलो होतो. आमच्या संपूर्ण टीम ची आठवण काढली. मी नशिबवान आहे की या teamचा भाग आहे. USA Tour मधल्या NJ च्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.

हास्यजत्रा टीमचा ब्रेक

काही महिन्यांपुर्वी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राने ब्रेक घेतला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेऊन काही महिन्यांचा ब्रेक घेतला होता.

स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी याविषयी माहिती दिली होती. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोच्या जागी KBC शो सुरु आहे. आता १४ ऑगस्ट पासुन महाराष्ट्राची हास्यजत्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT