Maharashtrachi Hasyajatra Onkar Raut Sharaddha :  
मनोरंजन

Onkar Raut : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या ओंकारवर श्रद्धा फिदा! 'त्याचं गाणं ऐकलं अन्...'

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं समीर चौगुले, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, दत्तू मोरे, ईशा डे, ओंकार भोजने यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtrachi Hasyajatra Onkar Raut Sharaddha : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काही मराठी मालिकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या मालिकेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रेक्षकांना हसवणं अन् हसवतं ठेवतं ही काही सोपी गोष्ट नाही. ते शिवधनुष्य या मालिकेनं समर्थपणे पेलले आहे.

सध्याच्या धकाधकीच्या युगात दोन घटका मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपल्यासमोर आहेत. पण त्यात फार थोड्या जणांनी प्रेक्षकांना जिंकून त्यांची पसंती मिळवली आहे. त्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा ही विनोदी मालिकेची गोष्टच काही और आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

Maharashtrachi Hasyajatra Onkar Raut Sharaddha

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं समीर चौगुले, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, दत्तू मोरे, ईशा डे, ओंकार भोजने यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. अशातच ओंकार राऊत नावाच्या कलाकाराची चर्चा सुरु झाली आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तर ओंकारवर फिदा झाली आहे. तिनं ओंकारचं गाणं ऐकलं आणि त्याचं कौतूक केलं आहे. ओंकारनं त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये पृथ्वीक ओंकारला एखादं बॉलीवूडमधलं गाणं गाण्यासाठी विनंती करतो. ओंकारनं आशिकी २ मधलं ते चाहू मैं या ना....गाणं गाऊन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

ओंकारचं ते गाणं श्रद्धानं ऐकलं आणि तिनं त्याचं मनसोक्तपणे कौतूक केलं. ओंकारच्या आवाजानं सगळेजण थक्क झाले होते. त्या व्हिडिओमध्ये ओंकार, शिवालीही दिसत आहे. यावेळी पृथ्वीकनं तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचविण्याचे आवाहन केले. काही नेटकऱ्यांनी देखील तो व्हिडिओ श्रद्धाला टॅग केला होता.

श्रद्धानं तो व्हिडिओ पाहून ओंकारची प्रशंसा केली आहे. वॉव सुपर किती गोड आवाज आहे....मस्त, अशा शब्दांत ओंकारचं कौतूक श्रद्धानं दिली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी ओंकारवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ओंकारनं त्या कमेंट्सचा स्क्रिनशॉट शेयर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

SCROLL FOR NEXT