Mahendra Singh Dhoni Bhuvan Bam celebrities  
मनोरंजन

Mahendra Singh Dhoni : धोनीच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी! होणार कारवाई, काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर देखील धोनीच्या नावाचा बोलबाला असतो. कोणत्याही वादात न अडकणारा, कुणालाही न बोलणारा धोनी मात्र एका प्रकरणामुळे अडचणीत आल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mahendra Singh Dhoni Bhuvan Bam celebrities : क्रीडा विश्वामध्ये सर्वाधिक चर्चेतील नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या नावाची लोकप्रियता अजुनही कायम आहे. सोशल मीडियावर देखील धोनीच्या नावाचा बोलबाला असतो. कोणत्याही वादात न अडकणारा, कुणालाही न बोलणारा धोनी मात्र एका प्रकरणामुळे अडचणीत आल्याचे दिसून आले आहे.

धोनीच्या विरोधात आलेल्या तक्रारींची नोंद आता भारतीय विज्ञापन मानक परिषद अर्थात एएससीआयनं घेतली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यत आमच्याकडे सर्वाधिक तक्रारी या महेंद्रसिंग धोनीच्या विरोधातीलच आहे. त्यामुळे आम्हाला येत्या काळात त्याच्यावर कारवाई करायची की नाही हे ठरवावे लागणार आहे. अशी माहिती परिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे. त्या तक्रारींमध्ये प्रसिद्ध युट्युबर भुवन बामचे देखील नाव आल्याची माहिती आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जाहिरात उद्योगाच्या स्व नियमक संस्था एएससीआयनं म्हटले आहे की, जाहिरात करणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रेटींच्याविरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडे आलेल्या तक्रारींची संख्याही जास्त आहे. त्या प्रसिद्ध किक्रेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि भुवन बाम यांच्या नावाचा समावेश आहे.

त्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२२ ते २०२३ मध्ये भारतातील चर्चेतील सेलिब्रेटींच्या विरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यांची संख्या ही ५०३ एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. मागील वर्षी ही संख्या ५५ एवढी होती. उपभोक्ता संरक्षण अधिनियमानुसार, ज्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत त्याची दखल घेऊन त्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

ज्यावेळी जे कुणी सेलिब्रेटी एखादी जाहिरात करतात तेव्हा त्यांनी नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा त्यांच्याकडून ते होत नाही. त्यानंतर आमच्याकडे तक्रारी येतात. मोठ्या व्यक्ती यांची जबाबदारी मोठी आहे. शेवटी अनेकजण त्यांच्याकडे पाहूनच बऱ्याच गोष्टींची दखल घेत असतात. असेही सांगण्यात आले आहे. यासगळ्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर सर्वाधिक १० तक्रारींची नोंद झाली आहे.

जाहिरात उदयोग संस्थेला यावर्षी ८ हजार ९५१ तक्रारी आल्या आहेत. त्यातील ७ हजार ८२८ तक्रारींची आतापर्यंत दखल घेण्यात आली आहे. यातीत बहुतांशी जाहीराती या डिजिटल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT