Jawan Release Mahesh Babu sends heartfelt wishes to Shah Rukh Khan's 'Jawan' ahead of release Tweet viral  Esakal
मनोरंजन

Jawan Release: "मलाही सोबत घेऊन जा"; जवान बद्दल महेश बाबूच्या प्रतिक्रियेवर शाहरुखने केला भन्नाट रिप्लाय

जवान पाहण्यासाठी लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळे उत्सुक आहेत. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा जवानला शुभेच्छा देत आहेत.

Devendra Jadhav

Jawan Release: शाहरुख खानच्या जवान सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. जवान रिलीज व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. शाहरुखचा जवान पाहण्यासाठी मध्यरात्रीपासुन रांगा लागल्या आहेत.

जवान पाहण्यासाठी लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळे उत्सुक आहेत. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा जवानला शुभेच्छा देत आहेत.

महेश बाबू यांनी ट्विट केले- आता जवानची वेळ आली आहे. शाहरुख खानची संपूर्ण ताकद ट्रेलरमधुन दिसतंय. संपूर्ण भारतात सिनेमा ब्लॉकबस्टर होण्यासाठी मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. माझ्या संपूर्ण कुटुंबासह चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.

महेश बाबूच्या या ट्विटवर शाहरुखने उत्तर दिले

महेश बाबूचे ट्विट शेअर करताना शाहरुख खानने लिहिले - मित्रा, तुमचे खूप खूप आभार. मला आशा आहे की तुम्हाला चित्रपट आवडेल. तुम्ही जेव्हा सिनेमा पाहायला जाल तेव्हा मला कळवा आणि मी येईन आणि तुझ्याबरोबर बघेन. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे. मोठ्ठी मिठी. शाहरुख खानचे हे ट्विट व्हायरल होत आहे, महेश बाबूच्या चाहत्यांना ते खूप आवडले आहे.

त्यात आता ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील शाहरुख खानच्या जवानसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. हि-मॅनने किंग खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले की, "शाहरुख मुला तूला जवानसाठी अनेक शुभेच्छा." शुभेच्छा त्यांनी शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.


'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Update : देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT