Mahesh Babu Teaming up With SS Rajamouli Esakal
मनोरंजन

SS Rajamouli: RRR नंतर राजामौलीचा आणखी एका पौराणिक चित्रपट.. हनुमानाच्या रुपात दिसणार 'हा' सुपरस्टार

Vaishali Patil

Mahesh Babu Teaming up With SS Rajamouli: एसएस राजामौली यांच्या आरआरआरने तर सगळ्या जगातच धुराळा केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर सुपरहिट ठरलाच मात्र त्याने ऑस्कर सारख्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. या चित्रपटाच्या यशानंतर चाहते फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत ती म्हणजे एसएस राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटाची.

गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा होती की, राजामौली यांचा आगामी चित्रपट हा इंडियाना जोन्स आणि जेम्स बॉण्ड यांच्या हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देणारा असेल. या चित्रपटात अभिनेता म्हणून साउथ सुपरस्टार महेश बाबू हा मुख्य भुमिकेत असेल.

आता या संदर्भात बातमी समोर आली आहे की, महेश बाबू हा राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटात हनुमान यांच्यासारखीच भूमिका साकारू शकतो.

महेश बाबू राजामौलीच्या पुढच्या चित्रपटात हनुमानजींपासून प्रेरित भूमिका साकारू शकतो. बजरंगबलीसारखीच भूमिका महेश बाबूची असून या चित्रपटातील व्यक्तिरेखा रामायणातील हनुमानजींच्या पात्राप्रमाणेच पुढे जाईल.

आरआरआरमध्ये ज्याप्रमाणे भीम आणि राम यांच्या पात्रांमध्ये साम्य दाखवण्यात आले होते, त्याचप्रमाणे या चित्रपटात महेश बाबूचे पात्र हनुमानजीपासून प्रेरित असणार आहे. असा दावा करण्यात येत आहेत.

राजामौली यांच्या पुढील चित्रपटाचे नाव काय असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सध्या या चित्रपटाच्या लेखनाचे काम सुरू आहे. शूटिंगही सुरू झालेले नाही.

हा चित्रपट भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असेल, ज्याचे चित्रीकरण अॅमेझॉनच्या जंगलात केले जाईल असा दावा करण्यात येत आहे. यात खुप तगडं व्हीएफएक्स वापरण्यात येईल जे हॉलीवूड चित्रपटांमध्ये व्हीएफएक्समध्ये काम करणारी कंपनी तयार करेल.

राजामौलींचा हा चित्रपट 2025 च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT