Shershah Movie Sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : शेरशाह : ये दिल मांगे मोअर

कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती देत पाकिस्तान्यांना हुसकावून लावणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रा यांच्याबद्दल सर्व भारतीयांना माहिती आहे व त्यांच्या बलिदानबद्दल अभिमानही.

महेश बर्दापूरकर

कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती देत पाकिस्तान्यांना हुसकावून लावणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रा यांच्याबद्दल सर्व भारतीयांना माहिती आहे व त्यांच्या बलिदानबद्दल अभिमानही. कॅप्टन बात्रा यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘शेरशाह’ हा विष्णूवर्धन दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या देशप्रेमाची, बलिदानाची व देशासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शन, छायाचित्रण, संवाद, संगीत व सिद्धार्थ मल्होत्रानं साकारलेली भूमिका यांच्या जोरावर देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवण्यात व एक चांगला युद्धपट पाहण्याचा आनंद देण्यात यशस्वी ठरतो.

‘शेरशाह’ची कथा सुरू होते कारगिल युद्ध अंतिम टप्प्यात पोचलेले असताना. कॅप्टन विक्रम बात्रा (सिद्धार्थ मल्होत्रा) पाकिस्तानी बंकर उद्धस्त करीत निघाला आहे आणि एका टप्प्यावर तो जिवाची पर्वा न करता पुढं झेपावतो. कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते व वीर योद्ध्याच्या लहानपणाची गोष्ट सांगण्यास सुरुवात होते. मिलिटरी स्कूलमध्ये शिकत असल्यानं विक्रमला लहानपणापासून सैन्यदलाचं आकर्षण असतं. जिद्दी स्वभाव व विगिषू वृत्ती यांमुळं तो वेगानं प्रगती करतो. डिम्पल चिमा (कियारा अडवानी) या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडतो. मात्र, डिम्पल शीख व विक्रम पंजाबी खत्री असल्यानं घरच्यांचा या विवाहाला विरोध असते. विक्रमला मर्चंट नेव्हीची मोठ्या पगाराची नोकरीही मिळते, मात्र ती संधी नाकारात तो सैन्यदलात भरती होण्यासाठी बाहेर पडतो. निवड झाल्यानंतर त्याची पहिली पोस्टिंग सोपोरमध्ये होते व तो तिथं आपली बहादुरी दाखवत वरिष्ठांची मर्जी संपादन करतो. तो आपल्या घरी सुट्टीवर आलेला असतानाच कारगिल युद्ध पेटते व मित्राला ‘तिरंगा लहराकर आउंगा या उसमें लिपटकर आउंगा,’ असे सांगत विक्रम सीमेवर हजर होतो. शेरशाह हे त्याचं टोपणनाव पाकिस्तान्यांनाही समजतं व या नावाची दहशत निर्माण होते. ‘ये दिल मांगे मोअर’ असे म्हणत तो अधिकाऱ्यांकडून अधिक जबाबदारी मागून घेतो व सर्वांत अवघड बंकर काबीज करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह कूच करतो...

कॅप्टन विक्रम बात्रा यांची कारगिलमधील कामगिरी, त्यांचे बलिदान व त्यांना मरणोत्तर मिळालेले परमवीरचक्र यांबद्दल सर्वच भारतीयांना माहिती आहे. कॅप्टन विक्रम यांचं बालपण, व्यक्तिगत आयुष्य आणि प्रेम यांबद्दल तुलनेनं कमी माहिती समोर आली आहे. चित्रपटातील हा भाग कॅप्टन विक्रम यांच्या सर्वोच्च त्यागामागची मानसिकता दाखवतो. डिम्पलबरोबरच्या त्यांच्या प्रेमाचे प्रसंग थोडे लांबले आहेत. मात्र, युद्ध सुरू होताच चित्रपट जोरदार वेग पकडतो आणि अक्षरशः खिळवून ठेवतो. पाकिस्तानी सैनिकानं `आम्हाला माधुरी दीक्षित द्या, चौकी सोडून जातं,’ असं म्हटल्यानंतरचं कॅप्टन बात्रा यांचं उत्तर आणि कृती हा प्रसंग भन्नाटच. युद्धाच्या प्रसंगांचं छायाचित्रण खिळवून ठेवणारं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रानं देहबोली व संवादांतून विक्रम बात्रा यांचा जोश, देशप्रेम ताकदीनं साकारलं आहे. प्रेमाच्या प्रसंगांतही तो शोभून दिसतो. कियारा अडवानीच्या वाट्याला आलेली भूमिका छोटी आहे.

एकंदरीतच, विक्रम बात्रा यांच्या शौर्याची गाथा पडद्यावर छान उतरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT