Mahesh Bhatt With Family Google
मनोरंजन

'माझ्या निधनानंतर माझं कुटुंब खूश होईल कारण...'; महेश भट्ट हे काय बोलून गेलेले?

निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट नेहमीच आपल्या खळबळजनक विधानांमुळे चर्चेत राहिलेले आहेत.

प्रणाली मोरे

Mahesh Bhatt Birthday: निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट नेहमीच आपल्या खळबळजनक विधानांमुळे चर्चेत राहिलेले आहेत. कितीदातरी त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना ट्रोल केलं गेलं आहे. आता सगळ्यांनाच माहीत आहे की महेश भट्ट यांचे कुटुंब खूप मोठे आहे. त्यांची एक्स-वाईफ किरण भट्ट या होत्या,ज्यांच्यापासून पुजा भट्ट आणि राहूल भट्ट ही दोन मुलं महेश भट्ट यांना आहेत. त्यानंतर महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न केलं होतं आणि लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या,एक आलिया भट्ट आणि दुसरी शाहीन भट्ट. महेश भट्ट यांनी आपल्या कुटुंबाविषयी एकदा खूप शॉकिंग स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे कुटुंब त्यांना जसा हवा तसा पाठिंबा देत नाही. (Mahesh Bhatt Birthday: when Mahesh Bhatt said, his family will be happy upon his death)

एवढंच नाही तर महेश यांनी हे देखील म्हटलं होतं की,''जर माझं निधन झालं तर माझ्या कुटुंबासाठी मी सोन्याची खाण सोडून जाईन ज्यानं माझं कुटुंब आनंदी होईल,अर्थात थोडं मिस करतील मला ते''. महेश भट्ट यांनी हे स्टेटमेंट सिमि ग्रेवालच्या चॅट शो मध्ये केलं होतं.

महेश यांनी म्हटलं होतं की,''आमच्या कुटुंबात तुम्ही कसे वागता,राहता यावर ठरतं की तुमच्याशी कसं वागायचं. तुम्ही एक ठोस भूमिका नेहमी बजावत आलं पाहिजे अन्यथा तुम्हाला नावं ठेवली जातात. आमच्या कुटुंबात काहीसं असंच चालतं. जसं मी माझ्या भावाच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो तर तो मला म्हणणार की कसा वाईट भाऊ आहे हा. जर मी माझ्या कुटुंबाचं नीट पोट भरू शकत नसेन तर लगेच मला म्हणणार मला कुटुंबाचा सदस्य म्हणून जबाबदाऱ्या पाळता येत नाहीत''.

यानंतर जेव्हा महेश भट्ट यांना विचारलं गेलं होतं की,'जर उद्या तुम्ही तुमच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पेलू शकला नाहीत तर तुमच्या कुटुंबावर याचा काय परिणाम होईल?' त्यावर महेश भट्ट म्हणाले होते की,''मला असं वाटत नाही की त्यामुळे त्यांना काही फरक पडेल''.

महेश भट्ट पुढे म्हणाले होते,''तुमच्या कुटुंबाप्रती काही जबाबदाऱ्या असतात,तुम्ही काही ध्येय निश्चित केलेली असतात आणि तेच तुमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते पण ते जेव्हा उरत नाही,तुम्ही त्यातनं अंग काढून घेता तेव्हा नातीही मग उरत नाहीत,ती मरतात''. ते म्हणाले होते,''जेव्हा कुटुंबप्रमुखाचे निधन होते तेव्हा घरातील लोक एकमेकांत प्राण्यांप्रमाणे भांडतात, एकमेकांच्या जीवावर उठतात हे मी पाहिलंय. जेव्हा मी मरेन तेव्हा मला माहितीय माझ्या कुटुंबात कोणी आपले वडील गेले म्हणून,कोणी पती गेला म्हणून मिस करेल मला. पण ते खूशही होतील हे समजल्यावर की मी त्यांच्यासाठी मागे सोन्याची खाण सोडून गेलोय''.

तसं इथं आवर्जुन नमूद करावसं वाटतं की महेश भट्ट् यांच्या कुटुंबाची खास गोष्ट ही आहे की त्यांच्या दोन्ही कुटुंबात खूप चांगलं नातं आहे. पूजा भट्ट आपली सावत्र आई सोनी राजदान आणि बहिणी आलिया व शाहिन यांच्या खूप जवळ आहे. त्या सर्वांमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड आहे हे अनेकदा दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : आता हिंदू माफ करणार नाही! राम मंदिर गैरव्यहार प्रकरणारून उद्धव ठाकरेंचा संताप, दादरमध्ये रामरक्षा आंदोलन...

farmer loan waiver: इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही; बारामतीत जयंती सोहळ्यात कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची मोठी घोषणा, काय म्हणाले..

'त्याने सिगारेटने मांडीला चटके दिले, कानशिलातही मारली'; नीती टेलरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली तो...

China Dumping: चीनच्या आणखी एका डावावर भारताचा प्रहार! शेतीत वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या आयातीवर मोठा निर्णय, नवे नियम लागू

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री थरार! ट्रक अडवून चालकाला मारहाण, ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला, अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT