Mahesh Bhatt Bollywood Director interview  esakal
मनोरंजन

Mahesh Bhatt : 'वयानुसार येणारं म्हातारपण स्विकारलं पाहिजे, नाहीतर...' महेश भट्ट आता काय बोलून गेले?

महेश भट्ट हे त्यांच्या वादग्रस्त आणि परखड विधानांसाठी ओळखले जातात.

युगंधर ताजणे

Mahesh Bhatt Bollywood Director interview : महेश भट्ट बॉलीवूडमधील असे सेलिब्रेटी आहेत ज्यांची नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि समीक्षक म्हणून त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींना चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

महेश भट्ट हे त्यांच्या वादग्रस्त आणि परखड विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या मुलीच्या बाबत केलेलं ते विधान सर्वाधिक चर्चेत आलं होतं. ती गोष्ट होती ९० च्या दशकांतील. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती. पण जेव्हा जेव्हा महेश भट्ट यांच्याविषयी बोलले जाते तेव्हा ती बाब पुढे येतेच. काही दिवसांपूर्वी महेशजींनी बिग बॉसमध्ये देखील केलेली कृती आणि वक्तव्य चर्चेत आले होते.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

जगभरातील सेलिब्रेटी त्यांना मिळणारे स्टारडम आणि त्यांचा चाहतावर्ग याविषयीच्या गप्पांमध्ये त्यांच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. आपला आवडता सेलिब्रेटी, त्याची कारकीर्द, त्याचे वय याबदद्लच्या बातम्या याला वाचकांचा प्रतिसाद मिळत असतो. एका मुलाखतीमध्ये भट्ट यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे.

भट्ट त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात की, प्रत्येक कलाकाराची एक वेळ असते. त्याचा दिवस असतो. त्यामुळे तो त्या वेळेत चमकतो. लोकप्रिय होतो. वेळेनुसार त्याला काही निर्णय घ्यावे लागतात. अर्थात त्यानं घेतलेले निर्णय सगळ्यांनाच आवडतात असेही नाही. मात्र आपण वेळेचा आदर ठेवला पाहिजे. वयानुसार आपल्यात होणारे बदलही स्विकारले पाहिजेत.

आपण जर ते बदल स्विकारले नाहीतर तर त्यातून होणाऱ्या चूकांना जबाबदार कोण असणार? निसर्गाचा नियम काय सांगतो, त्याचा आदर राखणे गरजेचे आहे. दैनिक जागरणला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भट्ट म्हणतात, प्रत्येक व्यक्ती त्याच्या येणाऱ्या पिढीला कोणता ना कोणता वारसा देऊन जाते. दरवेळी आपण सर्वश्रेष्ठ राहू किंवा असू ही भावना वेदना देणारी आहे. त्याचा विचार करु नये.

माझी मुलगी आलिया देखील मला नेहमीच तिच गोष्ट सांगत असते. आपल्याकडे लोकं म्हातारी होतात पण मोठी नाही. थोडक्यात काय आपल्याकडे लोकांचा दृष्टिकोन जोपर्यत बदलत नाही तोपर्यत मोठा बदल शक्य नाही. अशा शब्दांत भट्ट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT