Mahesh Kale Classical Singer Roja Janeman hindi Song viral esakal
मनोरंजन

Mahesh Kale : 'हे सुरांनो थंड घ्या ... !' रोजा जाने मन पडलं भारी! नेटकऱ्यांनी घेतली शाळा

प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे हा त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीतील गायकीमुळे चाहत्यांच्या आवडीचा गायक म्हणून लोकप्रिय आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mahesh Kale Classical Singer Roja Janeman hindi Song viral : प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे हा त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीतील गायकीमुळे चाहत्यांच्या आवडीचा गायक म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्या मैफलींना होणारी गर्दी, त्याला मिळणारा प्रतिसाद हा नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. सध्या एका महोत्सवामध्ये महेशनं जे गाणं गायलं त्यामुळे तो ट्रोल झाला आहे.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटामध्ये महेश काळेच्या गाण्यांनी चाहत्यांना वेडं केलं होतं. त्या चित्रपटातील गाण्यांसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या गाण्यांनी महेश काळेला प्रेक्षकांचे प्रेम मिळवून दिले. याशिवाय विविध संगीत महोत्सवांमधून, सण समारंभाच्यावेळी चाहत्यांना आपल्या अनोख्या सुरावटींनी स्वरानंद देणाऱ्या महेशच्या मैफलीला गर्दी वाढू लागली. परदेशातही त्याच्या कार्यक्रमांना गर्दी होऊ लागली.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आता महेश काळे त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यानं रोजा जानेमन गाणं गायलं आहे. मात्र ते त्यानं शास्त्रीय संगीताच्या पठडीत गायल्यानं चर्चेत आलं आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. घेई छंद मकरंद असो किंवा अरुणी किरणी सारखं गाणं असो त्यातून महेशनं चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गाण्यातून चाहत्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात. महेशनं मोठ्या प्रयत्नपूर्वक त्या पूर्णही केल्या आहेत.

Mahesh Kale memes

महेशनं रोजा जानेमन गाताना ज्या हरकती घेतल्या, त्याचा जो आवाज होता, जी सुरावट होती ती काही उपस्थित श्रोत्यांच्या पचनी पडली नाही की काय असा प्रश्न त्या व्हिडिओतून उपस्थित होतो आहे. त्यातच व्हायरल झालेल्या प्रतिक्रियेवरुन नेटकऱ्यांचा झालेला संताप दिसून येतो आहे. काहींनी महेशला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. एकानं तर आता रमजान सुरु असून रोजा असं गाऊन त्या रोजाची वाट लावू नका.अशी खोचक टिप्पणी केली आहे.

Mahesh Kale memes

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT