mahesh manjrekar marathi movie de dhakka 2 release on 5 august
mahesh manjrekar marathi movie de dhakka 2 release on 5 august  sakal
मनोरंजन

'दे धक्का २' चा धमाकेदार टीझर.. या दिवशी होणार रिलीज

नीलेश अडसूळ

de dhakka 2 : महेश मांजरेकरांचा 'दे धक्का' चित्रपट अजूनही आपण विसरलेलो नाही. हास्य, विनोद आणि भावनिक पदर असलेल्या या चित्रपटाने आपलं पुरतं मनोरंजन केलं. या चित्रपटाचा दुसरा भागही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा देखील केली होती. पण करोना काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्तच मिळाला नाही. अखेर या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाली, महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'दे धक्का २' चा टिजर शेअर केला आहे. (mahesh manjrekar marathi movie de dhakka 2 release on 5 august)

या पोस्ट मध्ये त्यांनी एक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘दे धक्का २’ मधील कलाकार आणि त्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये शिवाजी साटम (shivaji satam), मेधा मांजरेकर(medha manjrekar) , मकरंद अनासपूरे (makarand anaspure), सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) अशी तगडी स्टारकास्ट आहे. या विडिओला एक भन्नाट कॅप्शन त्यांनी दिले आहे. 'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय.. घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय.. १ २ ३ ४ "दे धक्का २" येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला...' अशा शब्दात त्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

या आधी गेल्यावर्षी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तसेच चित्रपट रिलीज करण्याची तारीख ही जाहीर करण्यात आली होती. १ जानेवारी २०२२ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता परंतु काही अडचणींमुळे तो पुढे ढकलण्यात आला. अखेर तो क्षण आला आहे. दे धक्का २ लवकरच रिलीज होणार या बातमीने प्रेक्षक आनंदी झाले आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'दे धक्का' हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. आता 'दे धक्का २' मध्ये काय नवीन हंगामा बघायला मिळणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT