mahesh manjrekar slams all participant in Bigg Boss Marathi 4 chavdi
mahesh manjrekar slams all participant in Bigg Boss Marathi 4 chavdi sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: यंदा सगळेच हिटलिस्ट वर.. आज मांजरेकरांची चावडी..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi: बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता चाळीस दिवस झाले आहेत. या चाळीस दिवसात आपण राडा, प्रेम, दंगा, तोडफोड सगळंच पाहिलं. चाळीस दिवसात चार स्पर्धक गेले आणि एक नवीन स्पर्धक म्हणजे स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड एंट्री झाली. सध्या घरातले वातावरण अत्यंत चढाओढीचे झाले आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठी झगडत आहे. या आठवड्यात 'कॉलेज' थीम मुळे स्पर्धकांनी बरीच दुनियादारी केली. या सगळ्याचा हिशोब आज मांजरेकर चावडीवर मांडणार आहेत.

(mahesh manjrekar slams all participant in Bigg Boss Marathi 4 chavdi)

आठवड्यात स्पर्धकांनी चांगलाच राडा घातला. या सर्वांचा हिशोब आज चुकता होणार आहे. कारण स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक वाट पाहत असतात ते बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. यंदा 'कॉलेज' ही थीम असल्याने स्पर्धकांनी प्रेमापासून ते राड्यांपर्यंत सर्व रंग दाखवले. याच त्यांच्या दुनियादारीचा लेखाजोखा आज बिग बॉसच्या चावडीवर येणार आहे.

याचा एक प्रोमो नुकताच आउट झाला आहे. 'या आठवड्यात कॉलेज लाईफ मध्ये दुनियादारी बघायला मिळाली. काही हमरीतुमरीला आले तर काही सच्चे यार झाले. त्यामुळे हे सगळेच आहेत आपल्या हिटलिस्टवर.. तेव्हा भेटूया बिग बॉसच्या चावडीवर' असे मांजरेकर म्हणतात. त्यामुळे आज काय होतंय,. कुणाची शाळा लागतेय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT