mahesh manjrekar was direct the film lalu prasad yadav  sakal
मनोरंजन

आणि मांजरेकरांनी चित्रपटाला थेट 'लालू प्रसाद यादव' असं नाव दिलं.. जबर किस्सा

या चित्रपटाची हवा झाली खरी पण बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप ठरला.

नीलेश अडसूळ

lalu prasad yadav : बिहारच्या राजकारणातील एक महत्वाचे नाव म्हणजे लालू प्रासद यादव. अत्यंत धुरंधर असा हा राजकारणी. आपल्या राजकीय प्रचंड इच्छाशक्तीने लालूजींनी बिहारचे मुख्यमंत्री पदही भूषवले आहे. हा पण त्यांचा जलजला केवळ बिहार मधेच नाही तर संबंध भारतात आहे बरं. लालू प्रसाद यादव हजे नाव माहित नाही असं शक्यतो होणार नाही. आणि महाराष्ट्रात हे नाव घराघरात माहित आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी लालूजींची नकार करून त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्यामुळे हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित. आज त्याच लालूजींचा वाढदिवस. या निमित्ताने हा एक खास किस्सा.. (mahesh manjrekar was direct the film lalu prasad yadav in 2005)

लालूजी आणि राजकारण हे समीकरण आपल्याला ठाऊक आहेच पण लालूजी आणि बॉलीवूड यांचेही हि कनेक्शन आहे. शत्रुघ्न सिंह, शेखर सुमन, प्रकाश झा ते अगदी किंग खान म्हणजे शाहरुख खान अशी बडी दिग्गज मंडळी लालूजींच्या मित्रांच्या यादीत आहेत. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर चित्रपट होणे स्वाभाविक आहे पण त्यांचे केवळ नाव चित्रपटाला देणे म्हणजे धाडसच. आणि हे धाडस केले होते दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी.

२००५ मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पद्मश्री लालू प्रसाद यादव’ या नावाने एक चित्रपट केला. ज्यात प्रमुख भूमिकेमध्ये सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, मौसमी मखीजा, किम शर्मा, अनुपमा वर्मा आणि स्वत: महेश मांजरेकर होते. चित्रपटाच्या कथेचा लालूप्रसाद यादव यांच्या जीवनाशी काही संबंध नव्हता. ही कथा लालू, प्रसाद आणि यादव या तीन वेगवेगळ््या भूमिकांची होती, ज्यांच्यामध्ये पद्मश्री नावाची एक तरुणी होती. यामध्ये सुनील शेट्टीचे नाव होते लालू, महेश मांजरेकर यांचे नाव होते प्रसाद आणि जॉनी लिव्हर यांचे नाव यादव होते. २००५ च्या देशाच्या राजकारणात लालू प्रसाद यादव यांच्या नावाची वारीचं हवा होती. म्हणूनच कदाचित महेश यांनी या चित्रपटाला लालूजींचे नाव दिले.

mahesh manjrekar was direct the film lalu prasad yadav

विशेष म्हणजे या चित्रपटात लालू प्रसाद यादव यांनी स्वतः एक छोटीशी भूमिका केली आहे. लालूंचे नाव दिल्याने चित्रपटाची चित्रपटाची देशभरात चर्चा झाली आणि इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या टीमने पटणा येथे जाऊन लालूप्रसाद यादव यांची भेट देखील होती. पुढे लालू यांनी चित्रपट पाहिला आणि प्रशंसादेखील केली. मात्र, बॉक्स आॅफिसवर चित्रपट फ्लॉप ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT