mahesh tilekar shares post about farmer's suicide  sakal
मनोरंजन

शेतकऱ्यांच्या रक्ताचं मोल व्यवस्थेला कधी कळणार? महेश टिळेकर संतापले..

बीड येथील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर महेश टिळेकर यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारला आहे. .

नीलेश अडसूळ

दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर (mahesh tilekar) हे कायमच समाजातील ज्वलंत विषय आणि समस्यांवर भाष्य करत करतात. अनेकदा त्यांच्या विचारांना ट्रॉलहि केले जाते. पण त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे अनेकदा बदल घडतानाहि दिसून आले आहे. मग तो मनोरंजन विश्वातील कंपूशाहीचा मुद्दा असो की जुन्या अभिनेत्रींना सन्मान देण्याचा मुद्दा असो. ते नेहमीच समाज माध्यमावर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रिकामे चित्रपटगृह आणि मराठी सिनेमा यावर भाष्य केलं होतं. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर प्रकाश टाकला आहे.

बीड येथील एका शेतकऱ्याने उसाच्या फाडला आग लावून आत्महत्या केली. हा भीषण प्रकार समोर येताच मोठ्या स्तरावर शोक व्यक्त करण्यात आला. पण त्यावर काही ठोस उपाययोजना कधीच आपल्याकडे होताना दिसत नाही. राजकारणी असो की सामान्य जनता आपल्याला शेतकऱ्यांचे मोल कधीच कळत नाही. याच गंभीर विषयाला महेश टिळेकर यांनी वाचा फोडली आहे आहे.

या संदर्भात त्यांनी फेसबुकला एक पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात, 'आणखी एक आत्महत्या.. शेतीप्रधान देशात बळीराजा सुखी नाही. व्यवस्थेने बळी घेतलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला मीडिया घेऊन नेते मंडळी गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत जातील, न्यूज चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज सुरू होतील, या घटनेचं भांडवल करून त्यात राजकीय रंग भरून विरोधक सत्ताधारी पक्षावर तुटून पडेल . पण..पण जीवाला मुकलेल्या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आधार देणारा कुणी नेता नाही..' (mahesh tilekar on farmer suicide)

पुढे ते म्हणतात, 'आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्याची बायको दुःख पचवून जगण्यासाठी इतरांच्या शेतात रोजंदारीवर खुरपणी करताना दिसेल. समाजातील तुम्ही आम्ही शिकली सवरलेली माणसं हॉटेलमध्ये जेऊन निमूटपणे आलेलं बिल देणारे शेतकऱ्या कडून 20 रुपयांची भाजीची गड्डी घेताना मात्र घासाघीस करताना दिसू. शेतकऱ्याच्या कष्टाचं आणि आटवलेल्या रक्ताचं मोल व्यवस्थेला कळणार कधी? भारत माझा देश आहे आणि या देशातील शेतकरी माझे अन्नदाते आहेत ही भावना सगळ्यांच्या मनात रुजणार कधी??' असा प्रश्न टिळेकर यांनी व्यवस्थेला विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

SCROLL FOR NEXT