Mahika Sharma  Team esakal
मनोरंजन

पॉर्नस्टारशी मैत्री माहिकाला पडली महागात

2 जुनला इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे (International sex workers day) साजरा केला जातो.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री माहिका (Mahika Sharma) आता वादाच्या भोव-यात सापडली आहे. त्याला कारणही तसचं आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून माहिकाकडे पाहिले जाते. तिचं म्हणणं आहे की, सेक्स वर्कर्स (Sex worker) बरोबर लोकं फारसं चांगल वागताना दिसत नाही. त्यांना अनेकदा हिंसेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या समाजात आणखी जागृती करण्याची गरज आहे. हे सांगताना माहिकानं जे सांगितलयं त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ( mahika sharma reveals friend adult star danny d she assumed as sex worker )

2 जुनला इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे (International sex workers day) साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्तानं माहिकानं एक किस्सा शेअर केला आहे. तिनं सांगितलय, माझी मैत्री पॉर्न स्टार डॅनी डी सोबत झाली होती. तिच्यासोबत मैत्री असणं हे मला चांगलेच महागात पडले आहे. तिच्यावरुन मलाही सेक्स वर्कर समजले गेले होते. या गोष्टीचा मला धक्काच बसला होता. त्यामुळे मला खूप मानसिक त्रासही झाला. अद्यापही आपल्या समाजात कशाप्रकारची विचारधारा आहे याचा प्रत्ययही यावेळी आला.

ज्यावेळी माझी डॅनी (Danny) सोबत मैत्री झाली होती. तेव्हापासून मला त्याचा खूप त्रास झाला. ती म्हणाली तो माझ्या आयुष्याचा खूप कठीण काळ होता. कारण माझी मैत्री डॅनी बरोबर होती. मलाही लोकं सेक्सवर्कर समजत होते. लोकं कोणतीही शहानिशा न करता कशाप्रकारे एखाद्यावर शिक्कामोर्तब करुन रिकामे होतात हे यानिमित्तानं दिसून आले आहे.

माझ्या आयुष्यात त्यावेळी खूप काही सुरु होते. त्याचे टेन्शन मला होतेच. याशिवाय डॅनी सोबतची मैत्री मला चांगलीच महागात पडली. शेवटी मला जगायचे होते. काही करुन स्वतला घडवायचे होते. अशावेळी लोकं काय म्हणतात याचा विचार करणं फारसं महत्वाचं नव्हतं. तेव्हापासून मी सेक्स वर्कर्ससाठी काम करायला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT