Mahira Khan  Esakal
मनोरंजन

Mahira Khan Depression: 'रईस'मुळे धमक्या अन् नंतर स्मोकिंग फोटो लीक! बॉलिवूडमुळे डिप्रेशनमध्ये होती पाकिस्तानी अभिनेत्री...

Vaishali Patil

Mahira Khan Depression: पाकिस्तानची प्रसिद्धी अभिनेत्री आणि शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातील सहकलाकार माहिरा खानला तिच्या दमदार अभिनय आणि स्पष्टवक्तेपणामूळे खास ओळखले जाते. माहिराची पाकिस्तानात नाही तर भारतातही जबरदस्त फॅन फॉलोवर्स आहे.

तिने अनेक हिट सिनेमांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा देखील महत्वाचा भाग होती मात्र नंतर ती बॉलीवूडमध्ये जास्त टिकू शकली नाही.

काही दिवसांपुर्वी माहिरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मात्र सध्या ती तिच्या एका मुलाखतीतमुळे चर्चेत आली आहे. तिने या मुलाखतीत खुलासा केली की ती बॉलिवूडमुळे डिप्रेशनची शिकार झाली होती.

2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्याचवेळी, माहिराने शाहरुख खानसोबतच्या 'रईस' या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्या दिवसांत तिला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात न येण्याच्या धमक्या मिळू लागल्या होत्या असा खुलासा तिने FWhy पॉडकास्टमध्ये केला.

यावेळी माहिरा म्हणाली, "मी रईस चित्रपट पूर्ण केला होता आणि सर्व काही ठीक चालले होतं. त्यानंतर अचानक हा उरी हल्ला झाला. राजकीयदृष्ट्या सर्व काही विस्कळीत झालं आणि परिस्थिती खुप बिघडली.

त्यावेळी मला भीती वाटली नाही पण सततच्या ट्विटमध्ये, मला कॉलद्वारे मला धमकावण्यात आले आणि ते खूप भीतीदायक होते.

"मला फक्त एवढीच इच्छा होती की मी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात जाऊ शकत नाही, पण पाकिस्तानमध्ये चित्रपट प्रदर्शित करू द्यावे कारण माझ्या देशातील लोक शाहरुख खानचे चित्रपट पाहायचे त्यांना तो आवडायचा"

माहिराचा रईस ज्या वर्षी रिलिज झाला त्यावर्षी 2017 मध्ये माहिरा खानचा रणबीर कपूरसोबतचा स्मोकिंगचा फोटो देखील लीक झाला होता.

हा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता. त्यामुळे तिला खुप ट्रोल करण्यात आले होते. या टीकेचा तिच्यावर खुप वाईट परिणाम झाला होता. ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

याबद्दल बोलतांना माहिरा म्हणाली की, "त्यामुळे मी खुप चिंतेत आणि नैराश्य गेले. माझ्यासाठी ती वेळ खुपच कठीण होती. माझ्यावर कुणी हल्ला केला आहे असं मला वाटायचं. भारतीय चॅनेलवर खुपच वाईट कमेंट्स सुरु होत्या.

त्यावेळी असा एक टप्पा आला की मी आतुन खुप खचले. खुप डिप्रेशनमध्ये गेले त्यामुळे मला पॅनिक अटॅक आला आणि मी बेशुद्ध पडले. त्यानंतर मी पहिल्यांदाच थेरपीला गेले मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. ते वर्ष खुप कठीण होतं. मला झोप येत नव्हती, माझे हात थरथरायचे."

यात पुढे माहिराने खुलासा केला की 6-7 वर्षांपासून डिप्रेशनवर उपचार घेत आहे तिने मध्ये उपचार बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र तिची तब्येत आणखीच बिघडली. आता ती औषधोपचारावर घेत आहे.

माहिरा खानने टीव्ही मालिका भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तिने 'नियात', 'हमसफर' आणि 'बिन रोये' या मालिकेतून विषेश लोकप्रियता मिळवली. आता ती तिच्या ओटीटी पदार्पणासाठी चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

SCROLL FOR NEXT