Maisie Williams esakal
मनोरंजन

Maisie Williams : 'गेम ऑफ थ्रोर्न्स'ची 'आर्या' भारतात आली, मुंबई पाहिल्यावर म्हणाली...

गेम ऑफ थ्रोर्न्स नावाची मालिका ज्यांनी पाहिली असेल त्यांना मेसी विलियम्स कोण आहे हे सांगण्याची गरज नाही.

युगंधर ताजणे

Maisie Williams Game Of Thrones Fame actress : गेम ऑफ थ्रोर्न्स नावाची मालिका ज्यांनी पाहिली असेल त्यांना मेसी विलियम्स कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. या मालिकेमध्ये तिनं आर्या स्टार्क नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेनं तिला जगभर मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. आर्या आता भारतात आली असून तिनं मुंबईतील तिच्या स्वागताचे फोटो शेयर केले आहे. त्यावर तिनं लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

मेसीनं तिच्या इंस्टावरुन काही फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये तिनं मुंबईमध्ये येताच ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला त्याचे फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत. त्याला आतापर्यत मोठा प्रतिसादही मिळाला आहे. भारतीय सजावट मेसीला खूप आवडली आहे. त्या सजावटीनं ती खूप भारावून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेसी ही वेगवेगळया कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, मेसी विलियम्स ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे त्यातील तिची रुम चाहत्यांना दाखवत आहे. भिंतीवर भगवान कृष्णाचा फोटो आहे. फरशीवर काढलेली रांगोळी ती दाखवत आहे. त्यात ती म्हणते आता कुठे मी मुंबईला आले नाही आणि माझं डोकं कामातून गेलंय. हा सगळा पाहूणाचार पाहून मी भारावून गेली आहे. मेसी जेव्हा डायनिंग टेबलाजवळ जाते तेव्हा तिच्यासाठी देण्यात आलेले गिफ्ट्स पाहून ती भारावून जाते.

मेसीविषयी आणखी माहिती सांगायची झाल्यास ती तिची डेब्यु सीरिज आहे. त्यातून तिनं मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेनं तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून गेम ऑफ थ्रोन्सचे नाव घेतले जाते. या मालिकेचा पहिला सीझन हा २०११ मध्ये आला होता. त्याचे आतापर्यत आठ सीझन प्रदर्शित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

SCROLL FOR NEXT