Majhi Tujhi Reshimgath last episode prarthana behere trolled sakal
मनोरंजन

Majhi Tujhi Reshimgath: सांभाळून पळ! हाडं मोडतील.. हिल्स घालून पळणारी प्रार्थना बेहेरे झाली ट्रोल..

माझी तुझी रेशीमगाठ मालिका सध्या अंतिम टप्प्यात आली असून जातानाही ही मालिका ट्रोल होत आहे.

नीलेश अडसूळ

माझी तुझी रेशीमगाठ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं.  मालिकेतील प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेची रोमॅन्टिक केमिस्ट्री तुफान हिट ठरली. ती इतकी की, ही बंद झालेली मालिका लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरू करण्यात आली. पण आता ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. पण जाता जाता ही मालिका आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behere) चांगलीच ट्रोल झाली आहे.

लग्न झालेल्या आणि पदरी एक मुलगी असलेल्या नेहाची ही कथा होती. नंतर ती एका उद्योगपतीच्या प्रेमात पडते, तो तिला स्वीकारतो आणि त्यांच्या सुखी सांसारला सुरुवात होते,यश व नेहाचा  मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते नेहा मालिकेतून गायब होते. पण ती पुन्हा एकदा मालिकेत अनुष्का बनून परतते. पण तीची स्मृती गेलेली असते. त्यामुळे अनुष्का आणि यशचे नाते कसे जुळणार अशी नवी कथा रंगते. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आहे. अनुष्काला सगळं आठवणार का? यश आणि ती एकत्र येणार का असे उत्कंठा वर्धक वळण मालिकेला मिळाले आहे.

हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

या मालिकेचा शेवटचा सिन नुकताच शूट झाला. या शूटवेळी अनुष्का म्हणजेच प्रार्थना बेहरे रस्त्यावर पळताना दिसतेय. हा प्रसंग तिने स्वतः आपल्या सोशल मिडिया अकाऊंटला शेयर केला आहे. यामध्ये ती हिल्स घालून अशी काय पळत सुटली आहे की ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, " बाई तू इतकी श्रीमंत आहेस तर स्वतःची गाडी का घेतली नाहीस" तर एक म्हणतो, " एकतर साडीमध्ये इतकी हाय हिल्स चप्पल घालून कुणी पळतं का?.. तर काहींनी लिहिलं आहे, ''काही पण दाखवतात.. एकतर ती पडेल किंवा साडी सुटेल", " तिने चप्पल हातात का घेतली दुसरी विकत घेतली असती इतकी श्रीमंत आहे ती", " आणि भररस्त्यात सामान्य माणूसपण पळत नाही असं केलं तर हाड मोडेल ना" अशा प्रतिक्रिया या तिच्या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

SCROLL FOR NEXT