majhya navryachi bayko fame actor garrys real wife phtotos 
मनोरंजन

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील गॅरीच्या खऱ्या बायकोचे फोटो एकदा बघाच !

वृत्तसंस्था

मुंबई : चित्रपटांसह मालिकांची लोकप्रियताही सर्वाधिक आहे. त्यामुळे विविध भाषांतील मालिका लोक आर्वजुन पाहतात. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्य़ाची बायको' ही लोकांच्या पसंतीत उतरली आहे. टीआरपीच्या आकड्यातही ही मालिका अव्वल आहे. पण, खऱ्या आयुष्यातील गॅरीची बायको कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का ? 

या मालिकेमधील राधिका, गुरुनाथ आणि शनाया या व्यक्तीरेखांना लोकांनी प्रचंड प्रेम दिले. राधिकाला धोका दिलेल्या गॅरीची भूमिका नकारात्मक असली तरी खऱ्या जीवनात लोकांना तो तितकाच आवडतो.  गॅरी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर याच्या बायकोचं नाव आहे सुखदा खांडकेकर. 

या क्युट कपलचं लव्हमॅरेज आहे. अभिजीत आणि सुखदा यांच्या एका कॉमन फ्रेंडमुळे त्या दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर मग प्रेमात झालं. 

काही वर्षे डेट केल्यावर हे दोघं लग्नबंधनात अडकले. सुखदा सोशल मीडियावर अॅक्टीव असते. अभिजीत आणि सुखदा एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रावर शेअर करत असतात. या कपलचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते त्यांच्या फोटोंवरुनच लक्षात येते. 

सुखदाही उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. सुखदा ही कथ्थक नृत्यांगनाआहे. सध्या ती हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करत आहे. 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' आणि मकरंद देशपांडे यांच्या 'शेक्सपिअरचा म्हतारा' या मराठी नाटकांतून तीने कां केलं आहे.

तर, 'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. विशेष म्हणजे संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. हिंदी मालिकांमधूनही ती झळकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT