rasika sunil 
मनोरंजन

शनायाने गायलेलं 'हे' गाणं ऐकलंत का? चाहत्यांचा मिळाला तुफान प्रतिसाद

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेतील शनाया या व्यक्तीरेखेमुळे अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहोचली. शनाया म्हणजेच रसिका ख-या आयुष्यात कशी आहे याविषयी जाणुन घेण्याची सगळ्यांची उत्सुकता वाढली. आता हळुहळु रसिकाच्या चाहत्यांना माहित झालं आहे की रसिका उत्तम अभिनयासोबतंच तेवढं उत्तम गाते देखील. तसंच तिने नृत्याचं शिक्षण देखील घेतलं आहे. नुकतंच रसिका सुनिलने गायलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘तुम बिन मोहे’ या गाण्याला युट्युबवर चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. 

रसिकाच्या या गाण्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे.  याबाबत ती सांगते, “आशुतोष सोहोनीने खूप अगोदर एक चाल तयार केली होती. मी अमेरिकेत लॉस एन्जेलीस मध्ये सिनेमा या माध्यमाचं शिक्षण घेत असताना माझी आणि आशुतोषशी चांगली मैत्री झाली. त्याने माझं गायन तपासलं. मी शास्त्रीय संगीत आणि नृत्याचं शिक्षण घेतलं आहे. माझा आवाज योग्य असल्याचं लक्षात येताच त्यावर शब्द लिहिले गेले. मीच मग व्हिडिओचं स्क्रिप्ट लिहिलं. त्यात आम्हाला तिथेच अनुप कुलकर्णी या कॅमेरामनची ओळख झाली. सर्वांचाच एकमेकांवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे काम करणं सोपं झालं. न्यूयॉर्कचं वातावरण खूप चांगलं असल्याने तिथे  आम्ही शूटिंग केलं.”

अभिनेत्री रसिका सुनिल सध्या मुंबईतच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारतेय. तर आशुतोष सोहोनी सध्या पुण्यात आहे. दोघे मिळून यानंतर अनेकदा अशी गाणी आणि इतर काही गोष्टी करणार आहोत मात्र सध्या दोघेही आपापल्या परीने काम करत असल्याचं तिने सांगितलं. रसिकाने आणखी एक गाणं नुकतंच गायलं आहे. इतकंच नाही तर ती मोठ्या पडद्यावर देखील लवकर झळकेल. नवीन वर्षात तिच्या काही मराठी सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं कळतंय.   

majhya navryachi bayko fame rasika sunil sing a song netizens respond strongly  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT