rasika sunil instagram
मनोरंजन

रसिका सुनीलचा शुभविवाह! गोव्याच्या किनाऱ्यावर बांधली लग्नगाठ

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलं लग्न

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने Rasika Sunil प्रियकर आदित्य बिलागीशी Aditya Bilagi लग्न केलं आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. रसिका आणि आदित्यने या लग्नाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या दोघांनी १८ ऑक्टोबर रोजीच लग्न केलं होतं. मात्र फोटो त्यांनी आज (३० ऑक्टोबर) पोस्ट केला आहे. (Rasky weds Adi)

सप्तपदी घेतानाचा फोटो रसिका-आदित्यने पोस्ट केला आहे. '१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न', असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. या फोटोच्या कमेंट्समध्ये चाहत्यांसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षावर केला आहे.

दोन वर्षांपूर्वी रसिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथे तिची आदित्यशी ओळख झाली. १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच रसिकाने तिचं रिलेशनशिप जाहीर केलं होतं. ‘सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन देत तिने आदित्यसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT