Malaika Arora Trolled: Esakl
मनोरंजन

Malaika Arora Trolled: मलायकाने लावला ग्लॅमरचा तडका मात्र नेटकऱ्यांचा का उडाला भडका? व्हिडिओ व्हायरल

मलायका अरोरा तिच्या आउटफिटमुळे ट्रोल झाली आहे.

Vaishali Patil

Malaika Arora Trolled: प्रसिद्ध बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा खूप लोकप्रिय आहे. वयाची पन्नाशी गाठणाऱ्या मलायकाच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे चाहते कौतुक करत असतात. मलायकाने या वयातही स्वत: ला फिट ठेवले आहे. मलायकाचे बरेच फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मलायका चित्रपट क्षेत्रात जास्त सक्रिय नसली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

मलायकाची लव्ह लाईफ, फोटो आणि डान्समुळे तिची सोशल मीडियावर चर्चा असते. मात्र बऱ्याचदा मलायका तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे ट्रोल देखील होत असते.

मलायका नुकतीच एका कार्यक्रमात गेली होती. नेहमी प्रमाणे मलायका या कार्यक्रमातही बोल्ड आणि स्टाईलिश आउटफिटमध्ये दिसली. मात्र नेटकऱ्यांना मलायकाचा हा लूक मुळीच पटलेला नाही. त्यांनी मलायकाला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इतकच नाही तर अनेकांनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.

मलायका अरोरा काल एका कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी मलायकाने एक्वा-ब्लू बॉडी फिट शिमरी गाउन परिधान केला होता. मोठे कानातले आणि हाय हिल्स घालत तिने हा लूक पुर्ण केला होता.

'मलायका उर्फी ला टक्कर देत आहे' अशी एक कमेंट तिच्या या पोस्टला आली आहे तर दुसर्‍याने लिहिले की, 'आजकाल फॅशनच्या नावावर लोक काहीही परिधान करतात'. एकानं लिहिलंय की, 'हे कोणत्या कंपनीचे डिझाइन आहे?' तर एक नेटकरी लिहितो की, 'उर्फीचं नाव तर उगाच चर्चेत आहे.'

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मलायका अरोरा शेवटची आयुष्मान खुरानाच्या 'अ‍ॅक्शन हिरो' चित्रपटातील आप जैसा कोई गाण्यात दिसली होती. सध्या ती झलक दिखला जा या शोमुळे चर्चेत आहे. मलायका हा शो जज करणार अशी चर्चा आहे.

तर मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झालं तर ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. काही दिवसांपुर्वी मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. या वयात मलायका तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral

Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

SCROLL FOR NEXT