Malaika Arora And Nora Fatehi Face Off dance on chaiyya chaiyya trolled for copying beyonce and shakira Google
मनोरंजन

Malaika-नोरा चा 'छैय्या छैय्या' गाण्यावरचा डान्स पाहून भडकले लोक; म्हणाले,'या दोघी म्हणजे..'

मलायकाच्या मूव्हिंग इन विथ मलायका शो मध्ये नोरा आणि मलायका एकमेकींना चॅलेंज देत छैय्या छैय्या गाण्यावर थिरकल्या,ज्यामुळे दोघी ट्रोल होत आहेत.

प्रणाली मोरे

Malaika Arora And Nora Fatehi Face Off dance: मलायका अरोरा आणि नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर गाजतायत. १९९८ साली रिलीज झालेल्या शाहरुख-प्रीती अन् मनिषा कोईरालाच्या 'दिल से..' चित्रपटात एक गाणं होतं ज्यात मलायका शाहरुखसोबत ट्रेनच्या छतावर नाचली होती. सिनेमा इतकंच त्या गाण्यानंही भरपूर प्रशंसा मिळवली होती.

तेव्हापासून आतापर्यंत मलायकाच्या त्या गाण्यातील अदांना अनेकींनी कॉपी केलं. आता नोरा फतेही सोबत मिळून स्वतः मलायकानं या गाण्यावर फेस ऑफ केलं आहे. फेस ऑफ म्हणजे एकमेकींना आव्हान देत डान्स करणं. यावेळी मात्र अंदाज बोल्ड आणि ग्लॅमरस दिसला. मलायका आणि नोरा या डान्ससाठी लेहेंगा नाही तर काळ्या रंगाचा हॉट शॉर्ट ड्रेस घालून दिसल्या. (Malaika Arora And Nora Fatehi Face Off dance on chaiyya chaiyya trolled for copying beyonce and shakira)

या दोघीही इतक्या हॉट अंदाजात त्या गाण्यावर नाचल्या आहेत की त्यानं इंटरनेटचं तापमान वाढलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा आहे की नोरा आणि मलायकाचा हा एकमेकींना चॅलेंज करत केलेला डान्स लोकांना मुळीच आवडलेला नाही. लोकांनी आता दोघींनाही ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मलायका आणि नोरानं .या आपल्या फेस ऑफ व्हिडीओत शकीरा आणि बियोंसेला कॉपी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचं ट्रोलर्स म्हणताना दिसत आहेत.

नोरानं आपल्या इन्स्टाग्रामवर या डान्सची व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''जर मी हा डान्स तेव्हा केला असता तर ट्रेनच्या छतावर चढून जोरजोरात ओरडली असती. मलायकासोबत डान्स करण्याचं माझं स्वप्न पू्र्ण झालं..नक्की बघा हा डान्स''.

सोशल मीडियावर ३० सेकंदाच्या या व्हिडीओला पाहून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही लोकांचा एक ग्रुप आहे जो डान्स पाहून दोघींची स्तुती करत सुटले आहेत. तर दुसरा वर्ग आहे जो शकीरा आणि बिंयोंसेची 'स्वस्तातली कॉपी' दोघींना म्हणताना दिसत आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,नोरा आणि मलायकाचा हा व्हिडीओ खरंतर शकीरा आणि बियोंसेच्या 'ब्यूटीफूल लायर' या व्हिडीओची सेम टू सेम कॉपी आहे. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'कधीपर्यंत हेच करणार तुम्ही.. शकीरा आणि बियोंसेला कॉपी करणं बंद करा'..

एका नेटकऱ्यानं व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे की, 'हा व्हिडीओ शकीरा आणि बियोंसेच्या डान्सशी खूप मिळता-जुळता वाटतो. काय तुम्ही दोघी, काहीच ओरिजनल बनवत नाही' तर आणखी एकानं लिहिलंय, 'एक स्वतःला शकीरा समजते तर दुसरी बियोंसे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT