Malaika Arora
Malaika Arora  
मनोरंजन

मलायकानं सांगितला त्या रात्रीचा प्रसंग, तेव्हाच झाला घटस्फोटाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून मलायकाचं नाव घ्यावे लागेल. सोशल (Bollywood Celebrity) मी़डियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. बॉलीवूडमधील लाईमलाईटमधील सेलिब्रेटी म्हणून (Viral News) मलायकाच्या नावाची ओळख आहे. तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. आता तिच्या रिलेशनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मलायका (Malaika Arora) ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूर सोबत (Arjun Kapoor) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. तिनं एका मुलाखतीतून त्या रात्रीचा प्रसंग सांगितला आहे त्यामुळे अरबाज खान आणि तिचा घटस्फोट झाला होता. Malaika Arbaaz khan Love story

अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. अजुन मलायका आणि अर्जुन कपूर यांनी लग्न केलेलं नाही. त्यांच्या लग्नाविषयी देखील नेटकरी चर्चा करत असतात. मलायकानं आपल्या गेल्या रिलेशनशिपमध्ये झालेल्या बेबनावाची गोष्ट नेटकऱ्यांना शेयर केली आहे. 2017 मध्ये तिनं अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला होता. त्यावेळी तिच्या चाहत्यांना मोठा धक्काही बसला होता. करिना कपूरच्या चॅट शो मध्ये तिनं आपल्या घटस्फोटाविषयी धक्कादायक खुलासा केला होता. मलायका म्हणाली होती, मी जेव्हा माझ्या कुटूंबियांना घटस्फोटाचा निर्णय सांगितला तेव्हा त्यांनी मला पुन्हा एकदा त्यावर विचार करायला सांगितलं होतं.

आम्ही दोघांनी या गोष्टीवर खूप विचार केला होता. त्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा विचार केला. त्या दिवसांत आम्ही फार वेगळ्या मनस्थितीतून जात होतो. त्या रात्री मी पुन्हा माझ्या कुटूंबियांशी घटस्फोटाच्या बाबत बोलले तेव्हा त्यांनी मला तु तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का, अशी विचारणा केली होती. मी माझ्या निर्णयावर ठाम होते. ती पूर्ण रात्र आम्ही एकमेकांशी चर्चा केली. आणि त्यातून मग वेगळं होण्यावर आमचे शिक्कामोर्तब झाले. शेवटी आपल्या कुटूंबातीलच अशावेळी मदतीला येतात. हे मला त्यातून दिसून आले. असेही मलायकानं यावेळी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT