Malaika Arora gets trolled after netizens find her walking style not so weird  sakal
मनोरंजन

Malaika Arora: आज बाई वाकडी नाही चाललीस.. मलायका अरोरा पुन्हा ट्रोल..

हल्ली चाहत्यांचे लक्ष मलायकाच्या कामाकडे कमी आणि चालण्याकडेच जास्त असतं.

नीलेश अडसूळ

मलायका अरोरा तिच्या चित्रपट आणि रिलेशनशिपपेक्षाही जास्त चर्चेत आहे ते तिच्या विचित्र किंवा वाकड्या चालण्यावरून. जेव्हा पासून तिचा वाकडा चालण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पासून तीला जबरदस्त ट्रोल करण्यात आलं होतं. पण आज मलायका चक्क नीट चालली म्हणूनही तिला ट्रोल केलं जातंय. थोडक्यात काय तरहल्ली चाहत्यांचे लक्ष मलायकाच्या कामाकडे कमी आणि चालण्याकडेच जास्त असतं, असं दिसतय.

(Malaika Arora gets trolled after netizens find her walking style not so weird)

बॉलिवूडमधील अतिशय फिट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. वयाची ४० ओलांडूनही मलायका तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. तिचे सतत जीम बाहेरचे आणि योग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये ती पोक काढून आणि कंबर वाकडी करून चालत होती. आणि तीला या व्हिडिओवरून प्रचंड ट्रोल केले गेले. इतकेच नव्हे तर एका पुरस्कार सोहळ्यात मलायकाच्या चालण्याची मनिष पॉलने नक्कल केली होती या व्हिडिओवरून पब्लिक पण विनोदी व्हिडिओ शेअर करत आहे. पण आज मलायका अरोरा पोक न काढता आणि सरळ चालताना दिसली..

मलायका अरोराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती कार मधुन बाहेर आली आणि ती घाई घाईत जीम मध्ये जाताना दिसत आहे. यावेळी मिडीयाला पण तीने इग्नोर केले. यंदा टी सरळ चालली म्हणून ती पापाराझीच्या नजरेत आली. तिच्या सरळ चालण्याच्या व्हिडिओवरुनही लोक तिला बोलत आहेत. एका नेटकऱ्याने "मलायका आज सकाळी सकाळी कुठे"असे विचारले आहे तर दूसरा म्हणतो, " आज हि चक्क सरळ चालली" तर एकाने म्हंटले आहे " मलायकाची पाठ नीट झाली वाटत" तर काहीनी तिचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

Winter Special Recipe: नेहमीच्या नाश्त्याला कंटाळलात? फक्त 15 मिनिटांत बनवा ‘हे’ क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे, घरच्यांकडून मिळेल कौतुक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT