Malaika Arora gets trolled for her walking style as she gets papped wearing a red strappy jumpsuit sakal
मनोरंजन

Malaika Arora: बाई, नवीन कपडे घे आता.. जम्पसूट वरुन मलायका झाली ट्रोल!

कशी चालतेय? कंबर मोडली वाटतं? मलायकाच्या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस..

सकाळ डिजिटल टीम

हल्ली अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपपेक्षा मलायका अरोराची चर्चा तिच्या फिटनेस आणि चित्रविचित्र कपड्यांवरूनच अधिक होते. तिचे वय ४९ झाले तरी आपल्या फिटनेससाठी मलायका अरोराने लोकांच्या मनात वेगळीच जागा केली आहे. मलायका तिच्या लूक, फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्ससाठी अनेकदा चर्चेत असते. पण तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिला ड्रेस सेन्स आणि चालण्यावरून चांगलेच ट्रोल केले जात आहे.

(How she is walking ..her back is broken??': Malaika Arora gets trolled for her walking style as she gets papped wearing a red strappy jumpsuit)

नुकताच मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या चालण्यावरून आणि तिने परिधान केलेल्या ड्रेसवरुन ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओमध्ये मलायकाने पीच कलरचा जंपसूट घातला असून तिचे चालणेही लोकांना खटकले आहे.

या व्हिडिओमध्ये मलायका बेन्ड होऊन म्हणजेच वाकून चालत आहे. मलायका असे फिरताना पाहून काही युजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक नेटकरी म्हणतो की "ती प्रेग्नंट आहे की काय" तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "तिच्या कंबरचे हाड तुटले आहे त्यामुळेच ती व्यवस्थित चालत नाही", तर एक म्हणतो, "मलायका मॅक्सी घालून आली की काय? एकाने लिहिले आहे की, "मलायका तु तर फॅशन आयकॉन आहेस ना तर काय ही ड्रेस स्टाइल, पैसे संपले की काय? तर एक म्हणतो,'ताई. नवीन कपडे घे आता..'

तिच्या या व्हिडिओने सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. कमेंट वाचून अक्षरशः हसायला येईल अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. तर काहींनी भाषेची मर्यादा सोडूनही तिच्यावर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT