Malaika Arora Hugs Ex-Husband Arbaaz Khan After Seeing Off Son Arhaan At Airport sakal
मनोरंजन

Malaika Arora Hugs Arbaaz Khan: घटस्फोटा नंतरही लेकासाठी मलायका-अरबाज एकत्र.. चाहते म्हणाले..

तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, मलायका अरोरा अरबाज खान एकत्र..

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora Hugs Arbaaz Khan: एकेकाळी बॉलीवूडमध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या जोडीला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत होते. मलायका आणि अरबाज यांनी 1998 मध्ये लग्न केले आणि 2017 मध्ये ते वेगळे झाले.

त्यांचे वेगळे होणे सर्वांनाच मोठा धक्का होता. दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे आणि आपापले आयुष्य जगत आहे. आता त्यांचा घटस्फोट झाला तरी एकमेकांबरोबर मैत्री कशी ठेवायची ही त्यांच्याकडून शिकावं..

आताही ते आपल्या लेकासाठी एकत्र आले. त्या क्षणाचा विडिओ सध्या व्हायरल होत आहे. शिवाय चाहते त्यांचे कौतुक ही करत आहेत.

(Malaika Arora Hugs Ex-Husband Arbaaz Khan After Seeing Off Son Arhaan At Airport)

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

मलायका अरोरा सध्या अर्जून कपूर बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे. आणि दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. तरीही आज मलायका आणि एक्स पती अरबाज खान यांनी घटस्फोटानंतर एकमेकांशी कसे राहायचे याचे उत्तम उदाहरण मांडले आहे.

घटस्फोट झाल्यानंतरही या दोघांचे चांगले संबंध आहेत आणि ते त्यांचा मुलगा अरबाजचे सहपालक आहेत. मलायका आणि अरबाज अनेकदा पार्ट्यांमध्ये आणि त्यांच्या मुलासोबत वेळ घालवताना दिसतात.

गुरुवारी रात्री, हे कपल आपल्या मुलाला अरहानला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी आले, कारण तो यूएसमधील त्याच्या कॉलेजला निघाला होता. सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मलायका आणि अरबाज यांनी आपापल्या कारमध्ये जाण्यापूर्वी मिठी मारली.

हे पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना', 'समजूतदारपणा', 'खरं प्रेम' अशा अनेक कमेंट यांच्या व्हीडिओवर आल्या आहेत.

अरबाज खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट "पटना शुक्ला"च्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे तर मलायका अरोरा 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT