Malaika Arora comment on Arbaaz Khan second marriage esakal
मनोरंजन

Malaika Arora insta post : अरबाजचं दुसरं लग्न अन् मलायकाची ती पोस्ट! नेटकऱ्यांनी लावला भलताच अर्थ

प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अरबाज खाननं २४ डिसेंबर रोजी दुसरं लग्न केलं.

युगंधर ताजणे

Malaika Arora comment on Arbaaz Khan second marriage : प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अरबाज खाननं २४ डिसेंबर रोजी दुसरं लग्न केलं. त्या लग्नाला खान कुटूंबीय हजर होतं. याशिवाय त्यांचे निवडक मित्र परिवारही उपस्थित होता. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. या सगळ्यात मलायकाच्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अरबाजच्या लग्नाला त्याचा मुलगा अरहानही हजर होता. लग्नाला मलायका काही हजर नव्हती. मात्र तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या पोस्टचे वेगळेच अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे. मलायकानं त्या पोस्टमध्ये जे काही म्हटले आहे त्याचा संबंध नेटकऱ्यांनी अरबाजच्या लग्नाशी लावल्याचे दिसून येत आहे.

आता तर मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या लग्नाची देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. खरं तर ते गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता नव्या वर्षात २०२४ मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांनी दोन्ही सेलिब्रेटींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मलायका आता तरी तुझ्या लग्नाची तारीख सांग, अशा अर्थाच्या कमेंट केल्या आहेत.

Malaika Arora comment on Arbaaz Khan second marriage

मलायकाच्या त्या पोस्टमध्ये असं तिनं काय म्हटलं आहे की ज्यामुळे तिच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव होताना दिसतो आहे. मलायकानं लिहिलं आहे की, मला आता जाग आली आहे. माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत. खाण्यासाठी पुरेसं अन्न आहे. त्यामुळे मी खूप आभारी आहे. खरं तर ती पोस्ट करताना मलायकानं कुणाचं नाव काही घेतलेलं नाही. पण नेटकऱ्यांनी ती पोस्ट कुणासाठी आहे त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

मलायका आणि अरबाज खान यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. २०१७ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोटही झाला. त्यांना अऱहान नावाचा मुलगा आहे. या सगळ्यात मलायकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडले गेले. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यात नेहमीच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण येत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT