Malaika Arora Google
मनोरंजन

अपघातानंतर मलायकाला सुरु झालाय 'तो' त्रास; सिनेमा पाहणंही अवघड झालं म्हणाली

मलायका अरोरानं एका मुलाखतीत आपल्या अपघाताविषयी आणि त्यानंतरच्या तिला होणाऱ्या त्रासाविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

प्रणाली मोरे

अभिनेत्री मलायका अरोराचा(Malaika Aroa) काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता, यामध्ये अभिनेत्री जखमी झाली होती. यात तिचं रक्तही खूप वाहून गेलं होतं. एक दिवस इस्पितळात राहून नंतर तिला घरी सोडण्यात आलं होतं. पण तेव्हाही ती व्हिलचेअरवर बसून घरी जाताना दिसली. सोशल मीडियावर तिचे या अवस्थेतले फोटोज व्हायरल झाले होते. घरी काही दिवस आराम केल्यानंतर आता मलायका पुन्हा कामावर रुजू झाली आहे. त्यानंतर मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत मलायका अरोरानं आपल्या अपघाताविषयी सविस्तर सांगितलंय. ती म्हणाली, ''मी शारिरीक आणि मानसिक रित्या पूर्ण डळमळली आहे. माझ्या शरीरावरच नाही तर त्या अपघातानं मनावरही आघात झालाय. मी अजूनही त्या अपघाताला विसरु शकले नाही''.

मलायका अरोराचा अपघात २ एप्रिल रोजी मुंबईत खोपोलीजवळ झाला होता. अभिनेत्री एका इव्हेंटवरुन घरी परतताना हा अपघात झाला होता. ज्यानंतर तिला इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. एक दिवसांत तिला घरी सोडण्यात आलं होतं. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलायाका म्हणाली,''तो अपघात एक अशी गोष्ट आहे की ज्याविषयीच्या सगळ्या आठवणी मला पुसून टाकायच्या आहेत. पण मी विसरु शकत नाहीय. शारिरीक नाही तर मानसिक रित्याही मी पूर्ण कोसळली आहे. मी जर कोणता सिनेमाही पाहतेय आणि त्यात अपघाताचा सीन आहे आणि रक्तपात दाखवला जात आहे तर मला लगेच त्याची भीती वाटू लागते. आणि मी सध्या अशाच परिस्थितून जात आहे. त्या अपघाताला मी विसरू शकले नाही''

मलायका अरोरा पुढं अपघाताविषयी सांगताना म्हणाली, ''मला काही वेळ कळलंच नाही की मी जिवंत आहे की मेली आहे. मी शॉक मध्ये गेले होते पूर्ण. माझं डोकं खूप दुखत होतं. मला फक्त एवढंच माहित करुन घ्यायचं होतं की मी जिवंत आहे की मेले. खूप रक्त वाहत होतं ते सगळं अचानक घडलेलं पाहून. मला फक्त जोराचा आवाज कानावर आदळला आणि मला धक्का लागला,सगळंच नजरेसमोर धुसर झालं. इस्पितळात जाऊन मला शुद्ध आली''.

गेल्या आठवड्यात मलायका अरोरानं एक फोटो शेअर केला होता,ज्यात ती घरी परतल्यानं खूश दिसत होती. मलायकाला दोन आठवड्यासाठी डॉक्टर्सनी आराम करायला सांगितलं होतं. पण त्यानंतर शूटिंगला परतल्यावर आपल्याला खूप थकवा जाणवत होता असं मलायका म्हणाली. आपल्या शरीरात जीवच नाही अशी जाणीव सारखी होत होती. प्रचंड थकवा जाणवत होता. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराला रणवीर-आलियाच्या लग्नाच्या रीसेप्शनला पाहिलं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT