Malaika Arora trolled for 'dressing up' at Siddhaanth Vir Surryavanshi's funeral netizens called 'Full fashion' sakal
मनोरंजन

Malaika Arora: अंत्यदर्शनाला पण काकू फॅशनमध्ये.. मलायका झाली पुन्हा ट्रोल!

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर अंत्यदर्शनासाठी गेलेल्या मलायकाला पाहून नेटिझन्स भडकले.

नीलेश अडसूळ

Malaika Arora: बॉलीवूड अभिनेत्री मलयका अरोरा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केलं जातं. तर आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा मलायकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. नुकतच अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीच दुःखद निधन झालं. शनिवारी सिद्धांच्या अंतदर्शनासाठी अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मलायका देखील आली होती, पण तिची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

(Malaika Arora trolled for 'dressing up' at Siddhaanth Vir Surryavanshi's funeral netizens called 'Full fashion')

मलायका अरोरा (malaika arora) सिद्धांतच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेली होती. सिद्धांच्या अंतदर्शनावेळीचा मलायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुःखद कार्यासाठी मलायकाने परिधान केलेला ड्रेस पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट करत तिला ट्रोल केलंय.

सिद्धांतच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या मलायकाने निळा रंगाचा फ्लोरल लॉंग ड्रेस परिधान केला होता जो पाठीच्या बाजूने काहीसा उघडा होता. तर गळ्याभोवती तिने एक स्कार्फ गुंडाळला होता. मलायकाचा हा लूक पाहून काही नेटकरी संतापले आहेत. एकाने कमेंट करत म्हटलं "कोणाच्याही अंत्यदर्शनासाठी असे कपडे घालून जाणं योग्य नाही आणि इथे आंटी तर फुल्ल फॅशनमध्ये आली आहेत."

अनेक नेटिझन्सने मलायकाला ट्रोल केलं असलं तरी काहींनी तिची बाजू घेत घेतली आहे. " कदाचित शूटिंगवरूनच ती गडबडीत त्याच्या घरी गेली असेल" असं काहींनी म्हटलंय. तर काहींनी, तिच्या कपड्यांपेक्षा ती वेळ काढून तिथे गेली हे जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हणत मलायकाला सपोर्ट केला आहे.

अनेक नेटिझन्सने मलायकाला ट्रोल केलं असलं तरी काहींनी तिची बाजू घेत घेतली आहे. " कदाचित शूटिंगवरूनच ती गडबडीत त्याच्या घरी गेली असेल" असं काहींनी म्हटलंय. तर काहींनी, तिच्या कपड्यांपेक्षा ती वेळ काढून तिथे गेली हे जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हणत मलायकाला सपोर्ट केला आहे.

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनामुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. कुसुम, कसोटी जिंदगी की, जिद्दी दिल माने ना या मालिकांमध्ये तो झळकला होता. शुक्रवारी जिममध्ये वर्क आऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT