Malaika Arora, Malaika Arora Video news, arjun kapoor  SAKAL
मनोरंजन

Malaika Arora Video: सेल्फी काढताना दिला धक्का.. मलायका अरोरा चाहत्यांवर भडकली

मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

Devendra Jadhav

Malaika Arora Video News: नुकतीच मलायका अरोरा दुबईत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिचा ग्लॅमरस अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तिला पाहून सर्व चाहते वेडे झाले.

काही चाहत्यांनी तिला चांगलेच फटकारले. चाहत्यांच्या गर्दीत मलायका अरोरा अस्वस्थ दिसत होती. तिने एका लेडी फॅनला प्लीज ढकलून देऊ नका, असे सांगितले. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

(Malaika Arora Video viral Shocked while taking a selfie.. Malaika Arora lashed out at fans)

हेही वाचा: Types of Vedas: वेदांचे प्रकार

मलायका चमकदार काळ्या बॅकलेस गाऊनमध्ये ग्लॅमरस अवतारात दिसली होती. आधी तिने पत्रकार परिषदेला हजेरी लावली आणि नंतर तिने भेटायला आलेल्या चाहत्यांसाठी वेळ काढला. ती सर्व चाहत्यांना भेटली आणि सर्वांसोबत तिने सेल्फी घेतला.

दरम्यान, सेल्फी काढताना मलायका अरोराला काही फॅन्सनी घेरले होते. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. त्याचवेळी गर्दीतील एकाने सेल्फी काढताना तिला धक्काबुक्कीही केली.

त्या क्षणी मलायका थोडीशी अस्वस्थ झाली, तेव्हा तिने एका फॅनला देखील अडवले, कृपया मला धक्का देऊ नका, असं ती म्हणाली.. मलायकाचे सिक्युरिटी गार्ड होते तिची सुरक्षा करत होते. अशाप्रकारे मलायकाची तिच्या फॅन्समध्ये पुन्हा एकदा क्रेझ दिसून आली.

यापूर्वी तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये मलायका म्हणाली की ती कधीकधी पापाराझींमुळे चिडते.

ती म्हणाली होती, "कोणीही मला धक्काबुक्की केल्याशिवाय किंवा काही गैरवर्तन केल्याशिवाय मी कधीच कोणाला शिवीगाळ केली नाही.

तुम्हाला फोटो काढायचे असतील तर मी नाराज होते, पण फक्त माझ्या स्तनांवर आणि नितंबांवरच लक्ष केंद्रित का करत आहात?" असा सवाल मलायकाने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT