malang
malang 
मनोरंजन

'मलंग'च्या सिक्वेलसाठी व्हा तय्यार, सिनेमाबाबत केली महत्वाची घोषणा..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमध्ये अनेकजण सिनेमांकडे वळले आहेत. त्यातंच डिजीटल प्लॅटफॉर्मवर अनेकजण त्यांचा वेळ देत आहेत. वेबसिरीज, सिनेमे बघण्याकडे सगळ्यांचा कल आहे अशातंच प्रेक्षकांच्या आवडत्या सिनेमाबद्दल त्यांनी चांगली बातमी मिळाली तर...? अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता आदीत्य रॉय कपूर स्टारर मलंग या सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय. याच कारणामुळे निर्माते आता या सिनेमाच्या सिक्वेलविषयी विचार करत आहेत. असं म्हटलं जातंय की या सिनेमावर काम देखील करायला सुरुवात झाली आहे. एका रिपोर्टनुसार, १५ मे ला निर्मात्यांनी हा सिनेमा डिजीटल प्लॅटफॉर्मवर लॉन्च केला होता. या सिनेमाला भारताव्यतिरिक्त इतर १२ देशांमध्ये ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्यामुळे या सिनेमाच्या टीमचा उत्साह वाढला आहे.

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या बाहेर मलंग डिजीटल जगात कॅनडा, दुबई, मलेशिया, न्यझिलँड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, केन्या, कतार, पाक आणि बांग्लादेशासोबतंच इतर अनेक देशांमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सतत ट्रेंडिंगमध्ये आहे. यामुळेच आता निर्मात्यांनी मलंगच्या सिक्वेलवर काम करणं सुरु केलं आहे.

निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, चित्रपटगृहांनंतर डिजीटलवर या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद पाहून मला प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. प्रेक्षकांचा हाच उत्साह पाहून आम्ही मलंग २ वर काम करत आहोत. मोहित आणि लव यांनी वेगाने काम सुरु केलं आहे. आम्ही याविषयी लवकरंच खुलासा करणार आहोत. 

अभिनेत्री दिशा पटानी देखील या बातमीने खुश आहे. या सिनेमाच्या सिक्वेलबद्दल दिशा सांगते, भलेही ती सध्या घराबाहेर पडू शकत नसली तरी घरातंच वर्कआऊट करत या भूमिकेची तयारी करत आहे. 

malang sequel film is happening says producer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT