Malayalam actor comedian Kochu Preman passes away sakal
मनोरंजन

Kochu Preman: मल्याळम अभिनेते कोचु प्रेमन यांचे निधन.. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी..

मल्याळम मनोरंजन विश्वातला एक दिग्गज विनोदी अभिनेता गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नीलेश अडसूळ

मल्याळम अभिनेता आणि विनोदावर अधिराज्य करणारे कोचु प्रेमन (Kochu Preman) यांचे शनिवारी 3 डिसेंबर) रोजी निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोचु प्रेमन यांच्या निधनानं मल्याळम मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.  

कोचु प्रेमन यांचे नाव मल्याळम मनोरंजन विश्वात अत्यंत आदराने घेतले जाते. अत्यंत जीवंत आणि सहज अभिनय करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात नाटकातून केली. नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक काळ त्यांनी काळात विनोदी भूमिका साकारल्या.

 त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेता पृथ्वीराज आणि नादिर शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कोचू प्रेमन यांना श्रद्धांजली वाहिली. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि नेते व्ही डी सतीसन यांच्यासह मल्याळम चित्रपट आणि मालिकांमधील कलाकारांनीही सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना आणि शोक व्यक्त केला आहे.

कोचु यांनी नाटकच नाही तर अनेक मल्याळम मालिकांमध्येही काम केले. तर जवळपास 250 हून अधिक चित्रपट त्यांच्या अभिनयाने गाजले आहेत. त्यांच्या विनोदी व्यक्तीरेखांना विशेष पसंती मिळाली. गुरु (1997), थेनकसीपट्टणम (2000), पप्पी अप्पाचा (2010) आणि लीला (2016) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलं. 'ओरु पप्पडवदा प्रेमम' (2021) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

SRH vs LSG: २६ वर ४ विकेट्स... शमी ऑन फायर! दोन चेंडूवर अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेडला धाडलं माघारी; इशानही स्वस्तात बाद, Video

'मी आणि गुलजार यांनी एकमेकांना शॉर्टमध्ये जास्त बघितलंय' जुन्या ट्रोलिंगवर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या...'टेनिससाठी आम्ही...'

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'

SCROLL FOR NEXT