malayalam actor Mithun Ramesh hospitalized suffer with Bell’s Palsy sakal
मनोरंजन

Mithun Ramesh: मल्याळम अभिनेता मिथुन रमेश रुग्णालयात दाखल.. दुर्मिळ आजाराची झाली लागण..

मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला केरळमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

Mithun Ramesh Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुनला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले असून त्याच्यावर सध्या केरळ मधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिथुनला 'बेल्स पाल्सी' हा दुर्मिळ आजार झाला आहे. 'बेल्स पाल्सी' हा अर्धांगवायूचा एक प्रकार असून यामध्ये चेहऱ्याच्या काही भागात पॅरालिसिस होतो. 

(malayalam actor Mithun Ramesh hospitalized suffer with Bell’s Palsy)

याबाबत मिथुनने स्वतः माहिती दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्यांना 'बेल्स पाल्सी' या आजाराबद्दल सांगितलं आहे. मिथुन म्हणाला, "मला 'बेल्स पाल्सी' हा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे मी माझे दोन्ही डोळे एकत्र बंद करू शकत नाही. त्रिवेंद्रम येथील अनंतपुरी रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत".

मिथुनला 2021 साली अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्याची प्रकृतीत सुधारणा झाली परंतु आता नव्याने हा आजार त्याला जडला आहे.

मिथुन रमेशने 2000 साली 'लाइफ इज ब्यूटीफुल' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हलक्या-फुलक्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची धुरा त्याने सांभाळली आहे. 'शेषम','रन बाबू', 'सैम' आणि 'जिमी ई वेदिन्ते ऐश्वर्यम' सारख्या सिनेमांत मिथुन रमेशने काम केलं आहे.

रेडिओ कार्यक्रमांमध्ये देखील त्याने सहभाग घेतला आहे. मिथुन रमेश हा मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT