Kollam Sudhi Death: Esakal
मनोरंजन

Kollam Sudhi Death: ग्रहण हटेना! कार अपघातात अभिनेत्याचा मृत्यू, आणखी तीन कलाकार गंभीर जखमी...

Vaishali Patil

Kollam Sudhi Death: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात एकामागून एक दु:खद घटना घडत आहे. चित्रपट सृष्टीपासून ते टीव्हीविश्वापर्यंत प्रसिद्ध कलाकार जगाचा निरोप घेत आहे. काही दिवसांपुर्वी सहा दिवसात चार कलाकार आपल्याला सोडून गेले.

४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी देखील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या दु:खातुन बाहेर पडलो नाहित तोच आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन कलाकार गंभीर जखमी झाले आहेत.

अमर उजाला दिलेल्या वृत्तांनुसार, पोलिसांनी सांगितले की, सुधी, उल्लास अरूर, बिनू आदिमाली आणि महेश ज्या कारमध्ये प्रवास करत होते ती पहाटे 4.30 च्या सुमारास कपमंगलम येथे एका ट्रकला धडकली.

या अपघातात 37 वर्षीय कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना थिसुरमधील कोडुंगल्लूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर कॉमेडियन बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश जखमी आहे.

कोल्लम सुधीने 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'कंथारी'मधून ऑनस्क्रीन पदार्पण केले. 'कट्टापनायाले ऋत्विक रोशन', 'कुट्टनादन मारप्पा', 'थिटा रप्पई', 'वकाथिरिवू', 'अॅन इंटरनॅशनल लोकल स्टोरी', 'एस्केप', 'केसू ए वेदिंटे नाधान' आणि 'स्वर्गथिले कत्तुरुम्बू' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केल होत. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT