Mallika Sherawat Bollywood Actress Birthday Story esakal
मनोरंजन

Mallika Sherawat Bday : 'लोकांचं फार मनावर घ्यायचं नसतं'! 5 कोटींच्या कारमधून फिरणारी 'मल्लिका' खऱ्या आयुष्यातही राणीच

मर्डरपासून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मल्लिका खऱ्या आय़ुष्यातही मोठ्या श्रीमंतीत राहत असल्याचे दिसून येते.

युगंधर ताजणे

Mallika Sherawat bollywood Actress Birthday Story : बॉलीवूडमध्ये मल्लिकाचं येणं आणि तिचं लोकप्रिय होणं या तिच्यासाठी खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत. दोन दशकांहून अधिक मल्लिकानं तिच्या बोल्डनेसनं वेगळी ओळख तयार केली आहे. तिची लोकप्रियता मोठी आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा मल्लिकाला इंस्टावर चाहत्यांची काही कमी नाही.

मॉडेल, अभिनेत्री म्हणून मल्लिकानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मर्डरपासून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मल्लिका खऱ्या आय़ुष्यातही मोठ्या श्रीमंतीत राहत असल्याचे दिसून येते. मल्लिकाचे घर, तिच्याकडे असलेल्या कार्स, तिची संपत्ती हे सगळं डोळे दिपवून टाकणारं आहे. मल्लिकावर काही जणांनी बोल्डनेस अभिनेत्री असाही शिक्का मारला होता. काहींनी तिला अभिनय कमी आणि बोल्डनेसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री असाही शिक्का मारला होता.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

मल्लिकानं फारसा कधीही लोकांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला नाही. तिचे म्हणणे असे की, तुम्ही तुमचे काम करा, प्रत्येकवेळी लोकांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला त्याचा त्रासच होईल. आणि दरवेळी लोकं तुमचं ऐकतील असेही नाही. तुम्हाला जसे वाटेल तसे मनसोक्त जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. अशीही प्रतिक्रिया मल्लिकानं दिली होती.

मल्लिकाचा राजेशाही थाट पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आज मल्लिकाचा वाढदिवस असून आपण तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. मल्लिकानं मर्डर, वेलकम, गुरु, हिस्स, द मिथ सारख्या चित्रपटातून काम केले आहे. द मिथ मध्ये तिला जगप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. २४ ऑक्टोबर १९७२ रोजी मल्लिकाचा जन्म हरियाणा राज्यात झाला. तिथेच तिनं तिचं शिभण पूर्ण करुन अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा असे होते. मात्र तिनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यावर रिमा नाव टाकून मल्लिका हे नाव घेतले. या नावाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले. आता भलेही मल्लिका लाईमलाईटपासून दूर गेली असेल मात्र तिनं तिचं अलिशान जगणं काही सोडलेलं नाही. राहायचं तर थाटातच अशा उक्तीप्रमाणे मल्लिकाचा प्रवास सुरु आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लिकाला स्पीड कारचा मोठा शौक आहे. तिच्याकडे अनेक स्पीड कार आहेत. तिच्याकडे हायटेक लॅम्बॉर्गिनी आहे. त्याची किंमत पावणे सहा कोटी रुपये इतकी आहे. मल्लिकाची ती कार अद्यावत सोयीसुविधांनी युक्त अशी आहे.

मल्लिकाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, काही दिवसांपूर्वी तिची नकाब नावाची वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेमध्ये तिनं ईशा गुप्तासोबत काही इंटिमेट सीनही दिले होते. तिचं म्हणणं होत एका पुरुष कलाकारासोबत असे सीन करण्यापेक्षा महिला कलाकारासोबत करताना मानसिक दडपण जास्त जाणवत नाही. मल्लिकाची ती सीरिज खूपच लोकप्रिय झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT