mallika sherawat 
मनोरंजन

"फक्त महिलांनाच दोष दिला जातो"; न्यूड दृश्यांबद्दल मल्लिका शेरावत व्यक्त

चित्रपटांमधील बोल्ड दृश्यांबद्दल मल्लिकाने मांडलं मत

स्वाती वेमूल

चित्रपटांमधील बोल्ड दृश्यांबाबत नेहमी अभिनेत्रींवरच निशाणा साधला जातो. अशा दृश्यांसाठी अभिनेत्यांना काहीच म्हटलं जात नाही, असं मत अभिनेत्री मल्लिका शेरावतने Mallika Sherawat व्यक्त केलं आहे. आपला समाज पुरुषप्रधान असल्याने फक्त महिलांवरच बोल्ड सीन्ससाठी टीका केली जाते, असं ती म्हणाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मल्लिका या फरकाबद्दल व्यक्त झाली. त्याचप्रमाणे हल्ली प्रेक्षकांचा अशा दृश्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याचंही तिने सांगितलं.

'बॉलिवूड लाइफ' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका म्हणाली, "पुरुषप्रधान समाज असाच असतो. नेहमी महिलांवरच निशाणा साधला जातो, पुरुषांना मात्र काहीच विचारलं जात नाही. हे फक्त भारतात होतं असं नाही, तर संपूर्ण जगात असंच चित्र आहे. पुरुषांना सर्व स्वातंत्र्य दिलं जातं. पण महिलांना प्रत्येक गोष्टीसाठी कारण द्यावं लागतं. ठराविक माध्यमंसुद्धा अशा दृश्यांना विरोध करायची. पण आता माध्यम बऱ्यापैकी साथ देतात. सध्या ऑनस्क्रीन न्यूडिटीकडे वाईट नजरेतून पाहिलं जात नाही. अशा दृश्यांकडे आता कलात्मक नजरेने अधिक पाहिलं जातं."

मल्लिका शेरावत चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. करिअरच्या सुरुवातीलाच मल्लिकाने बोल्ड भूमिका स्वीकारल्या होत्या. त्यापैकीच एक चित्रपट होता 'मर्डर' Murder. मात्र या चित्रपटात काम केल्याचे परिणामही तिला भोगावे लागले होते. 'मर्डर चित्रपटात बोल्ड सीन दिल्याने माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली होती', असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. मल्लिकाने २००३ मध्ये 'ख्वाहिश' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी तिने 'मर्डर' चित्रपटात भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने बोल्ड दृश्ये दिली होती.

"२००४ मध्ये जेव्हा मी मर्डर या चित्रपटात भूमिका साकारली होती, तेव्हा त्यातील हॉट आणि बोल्ड दृश्यांसाठी माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली होती. त्यावेळी मी चित्रपटांत केलेले सीन्स आता फार सामान्य वाटतात. आता लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे आणि आपला चित्रपटसुद्धा बदलला आहे", असं मल्लिका म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT