मनोरंजन

एक अनोखी प्रेमकथा 'मन झालं बाजिंद'

वैभव आणि श्वेता हे दोघे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहेत.

प्रियांका कुलकर्णी

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.

मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे.

पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: सटाणा-साक्री-शिर्डी महामार्गाचे काम रखडले; राष्ट्रवादीचे नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन, गुरुवारपासून काम सुरू होणार

Hasan Mushrif vs Satej Patil गोकुळच्या न्यायालयीन खर्चावरून सतेज पाटलांच्या टीकेवर हसन मुश्रीफांनी केले वक्तव्य

Pune Crime: पहाटे पोलिसांची घरांवर धडक; बारामतीत १३५ आरोपी जेरबंद, ६५ पकड वॉरंटमधील तर ७० फरार

FDA Action Against NSCI Club: मुंबईतील NSCI क्लबच्या किचनमध्ये माशा, झुरळांचा सुळसुळाट; FDAकडून खाद्य परवाना निलंबित

Latest Marathi News Update : २६ नोव्हेंबरला नागपुरात CJPची भव्य रॅली - अभिजित दिपके

SCROLL FOR NEXT