Manasi Naik Exclusive Interview, Actress speak about her divorce Esakal
मनोरंजन

Manasi Naik: 'माझी मुलींना हात जोडून विनंती...'; लग्न करताना कुठे चुकलं यावर स्पष्टच बोलली मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईकनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत आपल्या घटस्फोटाचे कारण सांगत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

प्रणाली मोरे

Manasi Naik: मानसी नाईक हे नाव सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. आता मराठी अभिनेत्री आहे तर तिचा एखादा सिनेमा येतोय म्हणून नाही तर अलीकडे मानसी चर्चेत आली ते तिच्या घटस्फोटामुळे. सोशल मीडियावर नवरा प्रदीप खरेरा सोबत अनेकदा तिचे डान्सिंग रील्स पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला,इतकं सगळं छान होतं मग अचानक घटस्फोट?

आता मानसीनं घटस्फोटाची बातमी खरी आहे यावर स्वतः शिक्कामोर्तब केल्यानंतर अर्थातच कारण काय? हा प्रश्न अनेकांना पडला असणार यात शंकाच नाही. यासंदर्भात मानसी नाईकनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कारणांची भलीमोठी लिस्ट भावूक होऊन सांगितलीच पण तिनं या मुलाखतीत आपण लग्नाचा निर्णय घेताना कुठे चुकलो हे कारण सांगत लग्न करण्यास इच्छुक मुलींना एक कळकळीची विनंती देखील केली आहे.

नेमकं काय म्हणाली मानसी नाईक...हे जाणून घ्यायचं असेल तर या बातमीत तिच्या मुलाखतीची लिंक जोडली आहे..ती संपूर्ण मुलाखत ऐकाल तर मानसीला दोष देणाऱ्या अनेकांना याचं उत्तर मिळेल कदाचित...(Manasi Naik Exclusive Interview, Actress speak about her divorce)

मानसी नाईकच्या मुलाखतीची सुरुवात होते ते तिच्या करिअरमधील चढ-उतारांपासून. अभिनयापासून करिअरची सुरुवात केली तरी आज फक्त सिनेमात एखाद गाणंच का वाट्याला येतं यावर मानसीनं जे उत्तर दिलं यावरनं समजतं की लढाऊवृत्ती तिच्यात मुळतः आहे. याच मुलाखतीत मानसीनं आयटम गर्ल आणि आयटम सॉंग असा ठप्पा आपण एखाद्या कलाकृतीवर आणि कलाकारावर का मारतो? असा सवाल देखील उठवला आहे.

संपूर्ण मुलाखतीत मानसी भावूक झालेली दिसून आली ते तिच्या घटस्फोटाचा प्रश्न निघाला तेव्हा. मानसीनं या मुलाखतीत घटस्फोटाचे कारण सांगत जे लोक तिच्यावर नवऱ्याचे पैसे संपले म्हणून त्याला सोडतेय,असा आरोप करत आहेत त्यांना एकप्रकारे सुनावलं आहे. लग्नात आपली सुरुवातीपासून कशी फसगत झाली यावर बोलताना मानसीनं प्रत्येक गोष्ट शेअर केली.

अर्थात त्यामुळे मुलाखत ऐकल्यावर मानसी नाईक विषयी ज्यांच्या मनात दुराग्रह असतील त्याला नक्कीच उत्तरं मिळत जातील. मानसीनं बॉक्सिंगपट्टू प्रदीप खरेरा आणि त्याच्या कुटुंबाविषयी आपल्याला आदर आहे असं सांगितलं खरं पण त्याचवेळी त्यांनी आपल्याला जी वागणूक दिलीय त्याला आता सहन मी करणार नाही,न्याय मागणार असं देखील म्हटलं आहे. तेव्हा मानसी नाईकची ही सविस्तर मुलाखत वर बातमीत लिंकच्या माध्यमातून जोडली आहे. एका क्लीकवर संपूर्ण मुलाखत आपण ऐकू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT