Manasi Naik Husband Pradeep kharera Post crying video, actress reveal the truth Instagram
मनोरंजन

Manasi Naik: व्हिडीओत रडून दाखवणाऱ्या नवऱ्यावर भडकली मानसी; पोलखोल करत म्हणाली,'आता दोन-दोन मुलींसोबत..'

गेल्या अनेक दिवसांपासून मानसी नाईक तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे,तिनं आतापर्यंत आपला नवरा बॉक्सिंगपट्टू प्रदीप खरेरावर अनेक आरोपही केले आहेत.

प्रणाली मोरे

Manasi Naik: 'वाट बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईकनं आतापर्यंत तिच्या नृत्याच्या तालावर अनेकांना ताल धरायला मजबूर केलं. पण आज ती मानसी नाईक वैयक्तिक आयुष्यात वाट्याला आलेल्या फसवेगिरीनं पुरती हलून गेली आहे. मात्र सध्या ती या आयुष्यातील कठीण प्रसंगाला धीरानं सामोरी जातेय हे तिच्या पोस्ट वाचल्या की लक्षात येतं.

वर्षभरापूर्वी झालेलं मानसीचं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कधी मानसीकडून तर कधी नवरा आणि बॉक्सिंगपट्टू प्रदीप खरेरा कडून होताना दिसत आहेत. केस कोर्टात सुरु असल्यानं दोघेही थेट बोलत नसले तरी शब्दांचा अचूक बाण एकमेकांना मारून जखमी करण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसत आहेत.(Manasi Naik Husband Pradeep kharera Post crying video, actress reveal the truth)

काही दिवसांपूर्वी मानसीचा पती प्रदीप खरेरानं आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडीओ रील पोस्ट केली,ज्यात एक गाणं बॅकग्राऊंडला वाजत आहे, अनं प्रदीपचे डोळे पाण्यानं भरलेले आहेत. इमरान हाश्मिच्या सिनेमातलं 'जुदा होके भी ,तू मुझमे कही बाकी है' हे गाणं त्या रीलमध्ये ऐकायला मिळालं.

ती रील पोस्ट करत प्रदीप खरेरानं कॅप्शनमध्ये लोकांना विचारलं आहे की, 'तुम्हाला कोणतं गाणं ऐकल्यावर रडू येतं?' बस्स...एवढं प्रदीपनं पोस्ट केल्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी प्रदीपच्या या पोस्टला थेट मानसी नाईकशी जोडलं. पण मानसीच ती,गप्प कशी बसेल तिनं देखील तिखट प्रतिक्रिया देत नवऱ्याला सुनावलं आहे.

Manasi Naik Husband Pradeep kharera Post crying video, actress reveal the truth

मानसी नाईकनं प्रदीप खरेराला स्पष्ट भाषेत सुनावत एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. तिनं त्यात लिहिलं,''आता तुझ्यासोबत दोन-दोन मुली आहेत..खरंतर रडण्याच्या ओव्हरअॅक्टिंगचे ५० रुपये कापायलाच हवेत. एकीकडे पार्ट्या करत मस्त आयुष्य जगतोय आणि इथे रीलमध्ये लोकांना रडून दाखवण्याची नाटकं..जा मीच फुकटमध्ये सहानुभूती देते तुला. जिच्या जीवावर खाल्लं,जिचा फुकट वापर करुन घेतला...कर्माचं फळ मिळेल...'', असं मानसीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आता मानसी नाईकची ही पोस्टही चर्चेत आली आहे. तिनं थेट प्रदीपच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी अप्रत्यक्षरिच्या टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT