mansi naik
mansi naik 
मनोरंजन

अभिनेत्री मानसी नाईक प्रदीपसोबत 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई :  अभिनेत्री मानसी नाईक तिच्या अभिनयासोबतंच उत्तम नृत्यशैलीमुळे देखील ओळखली जाते. लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले असताना आता अभिनेत्री मानसी नाईक देखील लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. नुकतीच मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरासोबत साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं. मानसीने अचानक दिलेल्या सरप्राईजमुळे चाहत्यांना आश्चर्याचा बसला होता. तेव्हापासून प्रदीपविषयी जाणून घेण्यासाठी आणि तिच्या लग्नाच्या तारखेविषयी तिचे चाहते उत्सुक होते.

आता मानसीने लग्नाची तारीख जाहीर केली असून ती नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीपसोबत लग्नगाठ बांधणार आहे. मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे.  मानसीने याविषयी बोलताना सांगितलं की, पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. १८ जानेवारीला मेहेंदी आणि संगीत सोहळा होईल. लग्नाच्याच दिवशी  म्हणजे १९ जानेवारीलाच हळदीचा कार्यक्रम होईल' अशी माहिती तिने चाहत्यांना दिली.

मानसीने पुढे म्हटलंय की, 'दोन्ही कुटुंबांनी परस्परसहमतीने छोटा आणि आनंददायी विवाहसोहळा करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आम्ही खूप जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला लग्नासाठी आमंत्रित केलं आहे.'

मानसी नाईक तिच्या उत्तम नृत्यामुळे ओळखली जाते. तिची 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही गाणी तुफान गाजली होती. मानसी सोशल मिडियावरही तितकीच ऍक्टीव्ह असते. टिकटॉकवर देखील वेगवेगळे व्हिडिओ करत तिने लाखो चाहत्यांना प्रेमात पाडलं होतं.  

manasi naik to tie the knot with beau pardeep kharera in pune  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT