Manasi Naik trolled after shared single photo, netizens ask her, Is there a divorce?  sakal
मनोरंजन

Manasi Naik: नवऱ्यासोबतचे फोटो डिलिट.. चाहते म्हणाले घटस्फोट झाला की काय?

'किती फोटो टाकायची तू तुझ्या नव-यासोबत? आता एकदमच प्रेम कमी झालं का?' चाहत्यांनी केला प्रश्नांचा भडिमार..

नीलेश अडसूळ

Manasi Naik: मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या बरीच चर्चेत आहे. तिचे करियर फारसे चित्रपटात होऊ शकले नाही पण तिने गाण्यांवर मात्र वेगळीच छाप उमटवली. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ आणि नुकतेच आलेले 'बाई एकदम कडक' या गाण्यांनी तिला चांगलीच प्रसिद्धी दिली. पण सध्या ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते म्हणजे तीचा घटस्फोट.. काही दिवसांपासून मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. हे दोघ लवकरच वेगळं होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. आता याबाबत जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे चाहत्यांच्या निदर्शनास आले आहे.

(Manasi Naik trolled after shared single photo, netizens ask her, Is there a divorce)

मानसीचा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. दीड वर्षांपूर्वी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला नी धूमधडक्यात लग्न केलं. त्यानंतर सोशलमिडियावर त्यांच्या एकत्र फोटोंचा आणि रिल्सचा जणू धडाकाच लावला होता. पण नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नाही, ही सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे दोघांत काही बिनसलं आहे का अशा चर्चांना उधान आले आहे. आता तर मानसीने तिचे आणि प्रदीपचे सर्व फोटो सोशल मिडियावर काढून टाकले आहेत. त्यामुळे ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

याबाबत तिने अधिकृत घोषणा केली नसली तरी तिनं तिच्या अकाउंटवरील नवऱ्याचं खरेरा हे आडनावही हटवलं आहे. त्यामूळे लग्नाच्या दिड वर्षातच दोघांच्या नात्यात दुरावा आला की काय त्याच्यातील प्रेमाचे नाते संपले असुन ही दोघं लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चाना उधान आलं आहे. 

नुकताच मानसीने एक फोटो आणि व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये नेटकऱ्यांनी तिच्या घटस्फोटाबाबत अनेक प्रश्न विचारले आहे. एकाने कमेंट केली आहे की, 'तुमचा घटस्फोट झाला असे एका चॅनेल वर कळले' तर एक म्हणतो, 'किती फोटो टाकायची तू तुझ्या नव-यासोबत? आता एकदमच प्रेम कमी झालं का?' तर एकाने , 'काय प्रॉब्लेम झाला आहे प्रदीप सोबत' असेही विचारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT