Manava Naik esakal
मनोरंजन

Manava Naik: 'रुको तेरे को दिखाता', उबेर चालकाची मराठी अभिनेत्री मनवाला धमकी

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकला एका वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Manava Naik: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकला एका वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. तिनं तो प्रसंग सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्या पोस्टवरुन आता महिलांसाठी रात्रीच्यावेळी कोणतं शहर सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यावरुन विचारला आहे. मनवानं देखील आपल्याबाबत जे घडलं ते इतरासोबत होऊ नये म्हणून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एका उबेरवाल्यानं मनवाला दिलेली धमकी आणि तो प्रसंग अभिनेत्रीनं त्या पोस्टमधून व्हायरल केला आहे.

रात्रीचे सव्वा आठ वाजले असतील. मी उबेर बूक केली. तो ड्रायव्हर त्याच्या फोनवर बोलत होता. मी त्याला त्याबाबत सांगितलं की, असं करु नको. त्यानं बीकेसीवरचा तो सिग्नलही ब्रेक केला. त्यावेळी देखील मी त्याला म्हटलं हे असं करु नको. मात्र त्यानं काही ऐकलं नाही. अखेर त्याला वाहतूक पोलिसांनी थांबवलं आणि त्याचा फोटो काढला. तेव्हा त्यानं त्या वाहतूक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा मी पुढे होत पोलिसांना म्हटलं जाऊ देत तुम्ही त्याचा फोटो काढून घेतला आहे.

त्यानंतर मात्र त्या उबेरवाल्याची अरेरावी सुरु झाली. तो मलाच म्हणाला की, तू भरणार आहेस का 500 रुपय़े? मी त्याला म्हटलं की, तू फोनवर बोलत होता. त्यानंतर त्यानं मला थेट धमकीच दिली की, रुको तेरे को दिखाता... मी त्याला म्हटलं पोलीस स्टेशन चलो. मग त्यानं गाडी एका बीकेसीच्या एका वेगळ्याच अंधाऱ्या जागेत नेली. मी त्याला म्हटलं मला पोलीस स्टेशनला जायचे आहे. त्यानं पुन्हा माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतरही तो मला मारण्याची धमकी देतच होता.

त्या उबेरचालकाच्या उद्दामपणामुळे मी भांबावून गेले होते. त्यानं फार जोरात कार चालवली. अशावेळी मी ओरडले. तो आवाज ऐकून दोन दुचाकीस्वारांनी आणि एका रिक्षाचालकानं त्या कारला अडवलं. आणि माझी सुटका झाली. मी सुरक्षित आहे. मात्र थोडी घाबरलीही आहे. असं मनवानं आपल्या त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आतापर्यत त्या पोस्टवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत वाहनचालकाच्या उद्दामपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

New Year Calendar : एका वर्षांत का असतात 12 महिने? 11 किंवा 10 का नाही..'या' राजाच्या निर्णयाने बदललं जगाचं कॅलेंडर, थक्क करणारी माहिती

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

SCROLL FOR NEXT