mandira bedi  Sakal
मनोरंजन

Mandira Bedi Birthday: एकेकाळी मंदिरा राहायची भाड्याच्या घरात, आज आहे करोडोंची मालकीण; जाणून घ्या संपत्तीबद्दल

मंदिरा बेदीचा आज 51 वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात तिच्या करिअरबाबत आणि तिच्या संपत्तीबाबत...

Aishwarya Musale

टीव्हीच्या दुनियेपासून ते चित्रपटांपर्यंत आणि मग क्रिकेटच्या मैदानापर्यंत मंदिरा बेदी खूपच प्रसिद्ध आहे. तिचे कौतुक करावे तितके कमी आहे. ती प्रत्येक अर्थाने परिपूर्ण कलाकार आहे. वयाच्या 51 व्या वर्षी आजकालच्या तरुण अभिनेत्रीही तिची अप्रतिम फिगर पाहून लाजतात.

मंदिरा जर सर्व क्षेत्रात परिपूर्ण असेल तर कल्पना करा की ती एका दिवसात किती कमावत असेल? तिची लाइफस्टाइल कशी असेल? आज आम्ही तुम्हाला मंदिराच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीबद्दल सांगत आहोत...

सिनेमाच्या दुनियेत छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या मंदिरा बेदीने आपल्या करिअरमध्ये सर्वप्रथम टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले. मंदिराला ऑडिशन दिल्यानंतर पहिला ब्रेक 1994 मध्ये डीडी नॅशनलच्या 'शांती' या मालिकेमधून मिळाला. मंदिरानं 'शांती' मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं . 'औरत', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'इंडियन आयडॉल', 'फेम गुरुकुल', 'डील या नो डील' या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात देखील तिनं काम केलं. तसेच मंदिरा ही आयपीएल आणि वर्ल्ड कप यांसारख्या मॅचचे अँकरींग देखील करते. 2003मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमध्ये मंदिरानं पहिल्यांदा अँकरींग केलं. मंदिरा आज करोडोंची मालकिन आहे, पण तुम्हाला माहित आहे का की एकेकाळी ही अभिनेत्री मुंबईत भाड्याच्या घरात राहायची?

अभिनेत्रीची एकूण संपत्ती 2.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये आहे. मंदिराच्या कमाईचा सर्वात मोठा हिस्सा चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून येतो. एका चित्रपटासाठी ती 50 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.

मंदिरा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहे. ती स्वतः साडी डिझाइन करते, जी Amazon, Flipkart आणि Myntra सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध आहे. याशिवाय गार्मिन इंडियाने मंदिरा बेदी यांना फिटनेस कोच आणि ब्रँड अॅम्बेसेडर देखील बनवले आहे, ज्यासाठी अभिनेत्री सुमारे 2 ते 4 कोटी रुपये घेते.

आजकाल स्टार्स त्यांच्या एका पोस्टवरून सोशल मीडियाच्या जगातून लाखो आणि करोडो रुपये कमावतात. अशा परिस्थितीत फिटनेस फ्रीक आणि स्टाईल आयकॉन असलेली मंदिरा कशी मागे राहील? इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला सुमारे 1.5 मिलियन लोक फॉलो करतात. जाहिरातीसाठी ती ब्रँड्सकडून लाखो डॉलर्स घेते.

मंदिराने तिचे फिटनेस फोटो, व्हिडिओ आणि स्टायलिश फॅशन लुक पोस्ट करून लाखो फॉलोअर्स मिळवले आहेत. पाहिले तर मंदिरा बेदीची वार्षिक कमाई सुमारे एक कोटी रुपये आहे आणि अभिनेत्रीची एकूण संपत्ती दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT