Mandira Bedi 
मनोरंजन

Mandira Bedi : ४९व्या वर्षीही न थांबता करते १०-२० हँडस्टँड्स; पाहा व्हिडीओ

मंदिरा बेदीचा फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

स्वाती वेमूल

अभिनेत्री मंदिरा बेदी Mandira Bedi तिच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. वयाच्या ४९ व्या वर्षीसुद्धा मंदिरा दररोज दहा किंवा शक्य होत असेल तर २० हँडस्टँड करते. याचाच व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून सध्या त्यावर कमेंट्सचा वर्षाव होतोय. या व्हिडीओमुळे मंदिराने न थांबता १० हँडस्टँड केले आहेत. (Mandira Bedi pulls off 10 handstands in a row in new workout video)

'दररोज १० हँडस्टँड करते, हा माझ्या डेली रुटीनचा एक भागच आहे. कधी १०, कधी २० तर कधी त्याहूनही अधिक हँडस्टँड मी करते. भिंतीला न टेकताही मी हे करू शकते', असं कॅप्शन तिने या व्हिडीओल दिलं आहे. वयाच्या ४९व्या वर्षीही इतका उत्साह, इतकी क्षमता आणि जिद्द पाहून चाहते हैराण झाले आहेत.

मंदिरानेही या आधीही अनेकदा तिच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचा बिकिनीतही व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मंदिराने दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे, इत्तेफार आणि साहो यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

१९९४ मध्ये दूरदर्शनवर 'शांती' नावाची मालिका आली होती. त्यात मंदिरानं जबरदस्त काम केले होते. तेव्हापासून तिच्यातील अभिनयाला पैलू पडण्यास सुरुवात झाली होती. कुठल्याही साच्यात अडकून न पडता नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यास तिने प्राधान्य दिले होते. क्रिकेटमध्ये समालोचन करुन वेगळा ठसा उमटवला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींविषयी खुलासा केला होता. 'मी बारा वर्षे मातृत्वापासून लांब राहिले त्याचे कारण करिअर हेच होते,' असं ती म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT